'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 17:26 IST2023-06-24T17:26:13+5:302023-06-24T17:26:48+5:30
Apoorva Nemlekar : 'मराठी बिग बॉस ४' मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे. सध्या अपूर्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे.

'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत
'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर(Apurva Nemlekar)ने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे. सध्या अपूर्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेत काम करत असताना तिला बॉडी शेमिंगवरुन ऐकावे लागले होते. त्यामुळे नंतर तिने ही मालिका सोडली. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सीजनमध्ये अपूर्वाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. यानंतर तिने तिच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. अपूर्वा गेल्या काही दिवसांपासून कमालीची फिट दिसू लागली आहे. तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले.
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यात तिच्यात झालेला बदल पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. तसेच तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली आहे. अपूर्वा सध्या सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत दमदार एन्ट्री घेत आहे.
अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठी ४ शोमुळे घराघरात पोहोचली. याआधी ती 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंता या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली होती. बिग बॉस मध्येही तिने अंतिम २ पर्यंत मजल मारली. मात्र शेवटी ठाण्याचा अक्षय केळकर विजेता ठरला.