​फराह खान आणि गणेश हेगडेला हृतिक रोशन मानतो गुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 05:32 PM2017-01-12T17:32:48+5:302017-01-12T17:32:48+5:30

हृतिक रोशन आज बॉलिवुडमधील सगळ्यात चांगल्या डान्सरपैकी एक मानला जातो. त्याने त्याचे नृत्यकौशल्य कहो ना प्यार है, कोई मिल ...

Farah Khan and Ganesh Hegdela Hrithik Roshan Manto Guru | ​फराह खान आणि गणेश हेगडेला हृतिक रोशन मानतो गुरू

​फराह खान आणि गणेश हेगडेला हृतिक रोशन मानतो गुरू

googlenewsNext
तिक रोशन आज बॉलिवुडमधील सगळ्यात चांगल्या डान्सरपैकी एक मानला जातो. त्याने त्याचे नृत्यकौशल्य कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांना दाखवून दिले आहे. आज त्याच्या अभिनयाचे जितके फॅन्स आहेत, त्याच्या कित्येकपटीने अधिक त्याच्या नृत्याचे लोक फॅन आहेत. हृतिकसारखा डान्सर बनण्याची इच्छा आज बॉलिवूडमधील प्रत्येक नवोदित अभिनेत्याची आहे. 
हृतिक आपल्या नृत्याचे श्रेय प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आणि गणेश हेगडे यांना देतो. हृतिक नुकताच झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या सेटवर आला होता. तिथे त्याने काबिल या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन केले. तसेच या कार्यक्रमात अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिला. या कार्यक्रमात तो फराह आणि गणेशसोबत काही गाण्यांवर थिरकलादेखील आहे. 
हृतिकचे गणेश आणि फराहसोबत एक स्पेशल नाते आहे. कहो ना प्यार है या त्याच्या पहिल्या चित्रपटाची कोरिओग्राफी फराहने केली होती तर गणेश कोई मिल गया या चित्रपटाचा कोरिआग्राफर होता. हे दोन्ही चित्रपट हृतिकच्या कारकिर्दीतील हिट चित्रपट आहेत. प्यार की कश्ती मैं हे या कहो ना प्यार है या चित्रपटातील गाण्यावर हृतिकला सगळ्यात पहिल्यांदा फराहने तिच्या तालावर नाचवले होते. आज एक परफॉर्मर म्हणून हृतिकने खूपच चांगली प्रगती केली आहे. तसेच कहो ना प्यार हैच्यावेळी एखादी डान्स स्टेप जरी हृतिकने चुकवली तरी मी चिडत असे असेही ती सांगते. तर कोई मिल गया या चित्रपटामुळे हृतिकच्या नृत्याचे प्रचंड कौतुक झाले होते यामुळे त्याच्या आयुष्यात गणेशला खूप महत्त्व आहे.  



Web Title: Farah Khan and Ganesh Hegdela Hrithik Roshan Manto Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.