सिद्धिविनायक मालिकेच्या सेटवर या कारणामुळे घाबरली फरनाझ शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 04:06 AM2018-03-24T04:06:17+5:302018-03-24T09:36:17+5:30
&TVच्या सिद्धिविनायक या मालिकेत सध्या फरनाझ शेट्टी मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. ...
&TV ्या सिद्धिविनायक या मालिकेत सध्या फरनाझ शेट्टी मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. सिद्धिविनायक या मालिकेच्या एका भागाचे चित्रीकरण करताना फरझानला चांगलेच टेन्शन आले होते. फरझानला आगीची खूप भीती वाटते. पण नुकतीच शूटिंगच्यावेळी आपल्या खऱ्या आयुष्यातील आगीच्या भीतीविरोधात लढताना फरझान दिसली. फरनाझने अगदी धाडसाने हा स्टंट पूर्ण केला असून ती कशा प्रकारे या परिक्षेतून गेली हा अनुभव तिने सांगितला.
सिद्धिविनायकच्या आगामी भागामध्ये विन ऊर्फ विनायकच्या विचारामध्ये मग्न असताना रिद्धी स्वयंपाकघरात काम करण्यात व्यग्र असते. नकळत तिच्या दुपट्ट्याला आग लागते आणि सिद्धी कशी कॉटेजमध्ये आगीमध्ये अडकली होती हे रिद्धीला आठवायला लागते आणि तिच्या डोळ्यासमोर सगळे तेच क्षण येऊ लागतात. पण नशीबाने, विनायक लगेचच येऊन आग विझवतो. या दृश्याविषयी रिद्धीची भूमिका साकारणाऱ्या फरनाझ शेट्टीने सांगितले, “आम्ही हा आगीचा सिक्वेन्स करणार आहोत हे जेव्हा मला सांगण्यात आले, तेव्हा मी खूप घाबरले होते. मला लहानपणापासूनच आगीची खूप भीती वाटते. या दृश्यात माझी ओढणी केरोसिनमध्ये भिजवलेली नायलॉनच्या कपड्याची होती आणि जी मला माझ्या हातात धरून ठेवायची होती. हे माझ्यासाठी मोठे संकटच होते. आग पसरली तर काय करायचे याचे मला टेन्शन आले होते. पण मालिकेच्या सर्व टीमने आवश्यक सुरक्षेची काळजी घेऊनच योग्य प्रकारे चित्रीकरण केले. हा सीन चित्रीत करत असताना आग पेटल्यानंतर तर मी फारच घाबरले होते. त्यामुळे मी ती ओढणी फेकून दिली. पण टीमने सीन कट केला नाही. पुढचे मिनिटभर ते माझी प्रतिक्रिया शूट करत होते. त्यामुळे त्यांना माझा अगदी नैसर्गिक अभिनय कॅमेऱ्यात टिपता आला.”
फरनाझने दिल की नजर से खुबसुरत, बालिकावधू, एक वीर की अर्दास... वीरा यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तिने साकारलेली बालिकावधू या मालिकेतील भूमिका तर खूपच गाजली होती. तिने सिद्धिविनायक या मालिकेआधी वारिस या मालिकेत काम केले होते.
Also Read : रिद्धीने हवाहवाई बनत श्रीदेवींना दिली श्रद्धांजली