अरे बापरे...! 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका सुभेदारवर पैसे चोरल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:26 PM2019-05-09T15:26:02+5:302019-05-09T15:26:29+5:30
झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मालिकेत रंजक वळण आले आहे. राधिका शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेली असताना तिच्यावरच पैसे चोरल्याचा आरोप होतो.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा नुकताच प्रसारीत झालेल्या भागात राधिका शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी पत्रकार परीषदेत जाते. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी जेव्हा ती सुटकेस खोलते तेव्हा त्यात पैशांऐवजी दगडी सापडतात. त्याच्यानंतर राधिकावर उलटसुलट चर्चा होते. दरम्यान राधिकाचा नवरा गुरूनाथ सुभेदारला खूप आनंद होतो आणि तो सर्वांसमोर राधिकाचा अपमान करण्यात यशस्वी होतो.
पण दुसरीकडे राधिकाला धक्का बसतो आणि पैसे गेले कुठे याचा विचार करू लागते.
राधिकाच्या ऑफिसमध्ये शेतकरी राधिकावर पैसे चोरल्याचा आरोप करू लागतात आणि बरीच टीका करू लागतात. हे सगळे ऐकून राधिकाला रडू कोसळते. पानवलकर हा सगळा आरोप स्वतःवर घेत सांगतात की ही माझी चूक आहे की मी पैसे नीट ठेवले नाही. परंतु, शेतकरी राधिकालाच दोषी ठरवतात व राधिका मसालेला कोर्टात घेऊन जाणार असल्याचे सांगतात.
शेवटी सौमित्र त्याच्या मित्राला बोलवतो जो पोलिस अधिकारी असतो. त्यावेळी गुरूनाथ सर्व आरोप सुरक्षा रक्षकावर टाकण्याचा प्रयत्न करतो. नक्की त्या सुटकेसमधील पैसे कोण चोरतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. हे काम गुरूनाथने राधिकाचा अपमान करण्यासाठी हे केले असेल का? हे सगळे आगामी भागात पाहणे कमालीचे ठरणार आहे.