वेब सेरीजमधील आकर्षक तारे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2016 09:22 AM2016-02-21T09:22:07+5:302016-02-21T02:22:07+5:30
वेब सेरीजची संस्कृती आता भारतातही रुढ झाली आहे. इतकेच नव्हे तर चांगली कामगिरीही करीत आहे. या वेब सेरीज सुपर ...
व ब सेरीजची संस्कृती आता भारतातही रुढ झाली आहे. इतकेच नव्हे तर चांगली कामगिरीही करीत आहे. या वेब सेरीज सुपर अर्बन आहेत. त्या अत्यंत छोट्या आहेत. भारतीय टी. व्ही. वर घडणाºया मालिकाप्रमाणे नसतात. या वेब सेरीजचे वैशिष्ट्य काय? नव्या दमाचे कलाकार यात काम करीत आहेत. फ्रेश चेहरे असल्याने आणि बॉलीवूड स्टार्सनी घासूनपुसून तयार केलेले नसल्याने त्यांना मागणी आहे. सध्या ही संस्कृती अद्याप रुजली नाही. त्यांचा अभिनय आणि नॅचरल लुक मुळे त्यांना मागणी आहे. अशाच या ताºयांविषयी माहिती देत आहोत.
अंगीरा धर
ती पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीमध्ये दिसली होती. ती मुख्य भूमिकेत काम करु शकेल असे कधीही वाटले नव्हते. वायआरएफच्या ‘बँग बाजा बारात’मध्ये ती दिसली आणि तिने सर्वांनाच चकीत केले. कॅडबरी जाहिरातीपेक्षा वेगळा तिचा अवतार होता. ती जणू बॉम्बशेलच दिसली होती. या मालिकांमध्ये तिने खूप छान काम केले आहे. येत्या काही दिवसात तिच्याकडून आणखी चांगल्या कामाची अपेक्षा आहे.
नवीन कस्तुरिया
रोडीज म्हणून काही व्हिडिओजमधून पाहिल्यानंतर रणविजयमध्ये तो कमालीचा दिसला आहे. तो चांगला अभिनय करु शकतो. सध्या तुम्ही त्याला नवीन बन्सल म्हणून ओळखता. त्याला ‘सुलेमानी किडा’मध्ये पाहू शकता. त्याने लवशुदा या चित्रपटातही काम केले आहे.
गौरव पांडे
कौटुंबिक चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहता येते. काही जाहिरातीमध्ये तुम्ही त्याला पाहिले असेल. वरुण धवनचा मित्र म्हणून ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात तुम्ही पाहिले असेल. ग्रामीण भागातील युवक म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता.
जितेंद्र कुमार
मोठ्या गोष्टी लहान पॅकेजमध्येच मिळू शकतात या गोष्टीची आठवण त्याच्यामुळे येते. आपल्या मनात असलेल्या हिरोप्रमाणे तो दिसत नाही. मात्र तो अभिनय चांगल्या पद्धतीने करु शकतो. पिचर्स मालिकेत तो काम करतो आहे. शाहरुख खान आणि काजोलच्या बनावट व्हिडिओमध्ये तो दिसला आहे. त्याची ‘अर्जुन केजरीवाल’ ही भूमिका सर्वांच्या लक्षात आहे.
सुमीत व्यास
बॉलीवूडमधील काही भूमिका आपल्या आवडणाºया नसल्या तरी लक्षात राहतात. अर्जुन कपूरचा औरंगजेब, श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लीश, कुणाल खेमूचा गुड्डूकी गन यांची नावे घेता येतील. सुमीतच्या काही भूमिका आपल्याला नक्कीच आवडतील अशा आहेत.
बिस्वपती सरकार
हा मुलगा खूप गुणी आहे. चाय सुट्टा क्रोनिकल या वेब सेरीजमध्ये तो काम करतो आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीची नक्कल तो करतो. तो माजी आयआयटीएन आहे. मात्र तो सुंदर अभिनेताही आहे.
निधी बिश्त
वकील असलेली निधी नंतर लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री बनली. तिने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले आहे. परमनंट रुममेट्स, चाय सुट्टा क्रोनिकल्स यांचा यात समावेश आहे. तिने यात एकता कपूरची नक्कल केली आहे.
आनंदेश्वर द्विवेदी
वेब सेरीजचा सलमान भाई म्हणून त्याला ओळखले जाते. वेब सेरीजचा तो सर्टिफाईड सलमान खान आहे. त्याच्याकडे खूप स्कील्स आहेत. परमनंट रुममेट्समध्ये त्याने काम केले आहे. त्याची विनोदी शैली अफलातून आहे.
अभय महाजन
वेब सेरीजचा आणखी एक कलाकार. त्याला मंडल म्हणून ओळखले जाते. पिचर्सच्या सिझन २ मध्ये तो आहे.
निधी सिंग
परमनंट रुममेटस् मालिकेत तिने तान्याची भूमिका केली आहे. दिल्लीच्या मुलीची ती छान भूमिका करते. दुसºया सिझनमध्ये ती गाजेल अशी अपेक्षा आहे.