नेहाचे नशीब जोरावर,मिळाली कपिलची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 10:23 AM2018-03-15T10:23:43+5:302018-03-15T15:53:43+5:30
'मे आय कम इन मॅडम' फेम नेहा पेंडसेची अवस्था आज मै उपर आँसमा अशीच झालीय आहे.याला एक खास कारणही ...
' ;मे आय कम इन मॅडम' फेम नेहा पेंडसेची अवस्था आज मै उपर आँसमा अशीच झालीय आहे.याला एक खास कारणही आहे.ते म्हणजे नेहा कपिल शर्मासोबत कॉमेडी शो फॅमिली टाईम होस्ट करणार असल्याची माहिती मिळते आहे.'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली होतीया मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.मालिकेत आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी नेहा प्रत्यक्ष जीवनातही आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.नेहाच्या इन्सटाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.त्यात तिचा बदललेला लूक पाहायला मिळतोय.तिने आपले वजनही कमी करत फिट पर्सनालिटी मिळवल्याचे फोटोत पाहायला मिळते आहे.मात्र नेहासाठीही इतरांप्रमाणे आपले वजन कमी करणे मोठे आव्हान होते.फिट पर्सनालिटी मिळवण्यासाठी फिटनेसचे गुपीत आहे पोल डान्स.नेहा दिवसभरात जवळपास दोन तास पोल डान्स करते त्यामुळे ती पहिल्यापेक्षा जास्त फिट पाहायला मिळत आहे.
कपिल शर्माची होस्ट बनणार म्हटल्यावर नेहाही खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावरही तिचे ग्लॅमर फोटो पाहायला मिळत असून फोटोत तिने वजन कमी केल्याचे पाहायला मिळत आहे.नेहानंतर विशाखा सुभेदारही कपिलच्या शोमध्ये झळकणार आहे.तिने आजवर अनेक नाटक, चित्रपट, मालिकेत काम केले आहे. आता विशाखा एका हिंदी कार्यक्रमात झळकणार आहे.विशाखा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.कपिल शर्माचा नवा कार्यक्रम सोनी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला विशाखाला पाहायला मिळत आहे. विशाखाच्या गेटअपवरून ती या कार्यक्रमात मोलकरणीची भूमिका साकारत असल्याचा अंदाज लावला जात आहे. विशाखाच्या करियरचा हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.त्यामुळे विशाखा आणि नेहा दोघींच्याही आनंदाला पारावर राहिलेला नाही.दिवसेंदिवस नेहाचे वजन वाढत असल्यामुळे ती ग्लॅमरस दिसत नाही.मेटेंन दिसत नाही. असा मालिकेच्या निर्मांत्यांच म्हणणे होते. तिच्या वाढत्या वजनामुळेच मे आय कम इन ही मालिका सोडावी लागणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.