Father’s day : 'मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि...'; 'भाबीजी घर पर हैं'फेम रोहिताश्वर गौर यांनी सांगितला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:00 AM2022-06-19T08:00:00+5:302022-06-19T08:00:02+5:30
Rohitashav Gaur: कायम प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे हे कलाकार अनेकदा खऱ्या आयुष्यात इमोशनलही होतात.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'भाबीजी घर पर हैं' (bhabhi je ghar par hai). अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक प्रकारचं गारुड घातलं आहे. त्यामुळे या कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. कायम प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे हे कलाकार अनेकदा खऱ्या आयुष्यात इमोशनलही होतात. मात्र, प्रेक्षकांना हसवण्यासाठी ही कलाकार मंडळी त्यांचं दु:ख मनात ठेऊन काम करतात. परंतु, यावेळी फादर्स डेच्या दिवशी मालिकेतील मनमोहन तिवारी ऊर्फ अभिनेता रोहिताश्वर गौर (Rohitashav Gaur) भावुक झाले आहेत. सोबतच त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवणही शेअर केली.
''माझे वडील माझ्या माहितीतले सर्वात सर्जनशील व्यक्ती होते. त्यांच्यामुळेच मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी माझी आवड जोपासली. ते एक उत्तम व्यक्ती होते आणि त्यांनी अबकारी व कर विभागातही काम केले होते. त्यांनी १९५५ मध्ये शिमला येथे ऑल-इंडिया आर्टिस्ट असोसिएशनचे नेतृत्व केले आणि मला वादविवाद, स्टेज शो व कविता स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. माझे वडील खरे सुपर डॅड होते, असं मनमोहन म्हणाले.
पुढे ते म्हणतात, त्यांनी माझ्यामध्ये प्रेम, सामर्थ्य, सहिष्णुता, स्वीकृती, शौर्य आणि करुणा यांसारखी मूल्ये रुजवली, जी मी माझ्या मुलीला देत आहे. मी सर्व सुपर वडिलांना पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो."
दरम्यान, रोहिताश्वर हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा रंगत असते.