सोनी मॅक्स 2चे टाईमलेस डिजिटल पुरस्कारांच्या तिसऱ्या सिझनमधून उलगडणार पन्नास आणि साठचे दशक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:55 AM2018-04-04T11:55:08+5:302018-04-04T17:25:08+5:30

समाजातल्या विविध समस्यांचे प्रतिबिंब चित्रपटांतून उमटत असते. ५० व ६० च्या दशकातल्या चित्रपट निर्मात्यांनी तर विविध सामाजिक विषयांना आपल्या ...

Fifty and sixties to appear in the third season of Sony Max 2's Timeless Digital Awards | सोनी मॅक्स 2चे टाईमलेस डिजिटल पुरस्कारांच्या तिसऱ्या सिझनमधून उलगडणार पन्नास आणि साठचे दशक

सोनी मॅक्स 2चे टाईमलेस डिजिटल पुरस्कारांच्या तिसऱ्या सिझनमधून उलगडणार पन्नास आणि साठचे दशक

googlenewsNext
ाजातल्या विविध समस्यांचे प्रतिबिंब चित्रपटांतून उमटत असते. ५० व ६० च्या दशकातल्या चित्रपट निर्मात्यांनी तर विविध सामाजिक विषयांना आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून हात घातला होता. त्या काळातल्या चित्रपट निर्मात्यांनी संपूर्ण जबाबदारीच्या जाणिवेतून राष्ट्रउभारणीचा संदेश देणारे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनवले. आपण जेव्हा हे जुने चित्रपट पाहतो, तेव्हा जगातल्या ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा आपण विसरतो, त्या गोष्टींनी आपले डोळे लख्ख उघडतात. स्वातंत्र्योत्तर सामाजिक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, गरीबी, बेरोजगारी, जातीय भेदभाव, जातीव्यवस्था आणि गुन्हेगारीला सामोरे जाणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतील हे ५० आणि ६० च्या दशकातील चित्रपट. त्या चित्रपटांतून त्या काळातल्या परिस्थितीचे प्रत्ययवादी आकलन आज
आपल्याला होते. पारतंत्र्याच्या सहा दशकांमध्ये सामाजिक समस्यांवर आधारलेल्या आणि आजच्या काळातल्या परिस्थितीशीही तंतोतंत जुळणाऱ्या चित्रपटांचा आढावा आपण येथे घेऊ या...

मदर इंडिया आणि दो बिघा जमीन – आर्थिक असमानता
श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो आणि गरीब रोजच अधिकाधिक गरीब होत जातो, ही समाजातली आर्थिक असमानता आपल्या भारत देशात राजेशाही नांदत होती. ही दरी ब्रिटीश राजवटीत आणखीच वाढत गेली आणि स्वातंत्र्योत्तर काळातही ही परिस्थिती तशीच राहिली. आपल्या देशात त्या काळात गरिबांची, विशेषतः शेतकरी वर्गाची सर्वांगीण परिस्थिती कशी होती, यावर मदर इंडिया आणि दो बिघा झमीन यांसारख्या चित्रपटांतून चपखलपणे भाष्य करण्यात आले आहे. यातून त्या काळातला प्रत्येक भारतीय गरिब आणि मोडलेला आशेचा कणा यांचे चित्र मांडण्यात आले आहे.

देवदास आणि मुघल-ए- आझम – प्रेमापेक्षा जात, धर्म आणि सामाजिक प्रतिष्ठांची ताकद अधिक
लग्नगाठी या स्वर्गात बांधल्या जात असल्याचे मानले जाते. परंतु, आपल्या पृथ्वीवर जाती, धर्म आणि सामाजिक दर्जाच्या पारंपरिक व पुरातन मान्यतांतून या प्रेमाच्या भावनांवर नियंत्रण मिळवले जाते. देवदास आणि मुघल-ए- आझम या दोन प्रेमकथांमधून देशात प्रेमी युगुलांची अवस्था त्या काळात कशी होती, हे दिसून येते. हे चित्रपट पाच दशकांपूर्वी बनवले गेले असले,
तरीही आजच्या आपल्या सामाजिक परिस्थितीतही या कथा तंतोतंत जुळून येतात.


सुजाता – अस्पृश्यता 
अस्पृश्यतेसारख्या गंभीर सामाजिक विषयाला हात घालणारा “सुजाता’’ हा चित्रपट एक ब्राह्मण मुलगा आणि अस्पृश्य अनाथ मुलगी यांच्यातल्या प्रेमकथेचे चित्र उभे करतो. समाजाने त्यांच्या जोडप्याकडे तुच्छतेने पाहिल्यामुळे एकत्र येण्यासाठी व राहण्यासाठी त्यांना समाजाशी झगडावे लागले. अस्पृश्यतेकडे एक संकल्पना म्हणून पाहिले तर, आता भारताने बरीच सांस्कृतिक क्रांती पाहिली आहे. तरीही, आजही आपल्या समाजाने स्पृश्य-अस्पृश्य भेद पूर्णतः सोडून दिलेला नाही.


श्री 420 आणि आवारा –गरिबीतून गुन्हेगारीकडे जाणारा समाज
५० आणि ६०च्या दशकात बहुतेक चित्रपटांमध्ये एक समस्या म्हणून गरीबीचे चित्रण मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. अवारा आणि श्री 420 हे असेच सिनेमे. यात तरुणांवर गरिबीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला.

हिंदी सिनेमांचा सुरुवातीचा, स्थापनेचा काळ सोनी मॅक्स 2 तर्फे सेलिब्रेट करण्यात येत असून ५० व ६०च्या दशकातल्या सदाबहार चित्रपटांसाठी प्रेक्षकांची मते मागवण्यात आली आहेत. मत देण्यासाठी लॉग ऑन करा - https://max2awards.sonyliv.com/



Web Title: Fifty and sixties to appear in the third season of Sony Max 2's Timeless Digital Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.