सख्खे मित्र झाले पक्के वैरी!! अभिजीत सावंतमुळे अरबाज-निक्कीमध्ये महाभारत, A टीममध्ये मोठी फूट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:11 AM2024-08-20T10:11:12+5:302024-08-20T10:11:26+5:30
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अरबाज, निक्कीमध्ये मोठा राडा झालेला दिसून आला. अभिजीत सावंत याचं कारण बनला (abhijeet sawant)
'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. काल सोमवारपासून घरात चौथ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना माहितीये की घरात दोन ग्रुप झाले असून दोन्ही गट त्यांच्या परीने घरात उत्कृष्ट खेळ खेळत आहेत. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं आणि बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळालं. पण चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. काय झालं नेमकं?
अभिजीत-निक्कीमध्ये मोठी फूट
'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात निक्की आणि घन:श्याममध्ये भांडण झालेलं पाहायला मिळालं. आता आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला म्हणत आहे,"तुला वाटतं का की, मी मनापासून माफी मागत नाही". त्यावर अभिजीत म्हणतो,"हा तू मनापासून माफी मागते". निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे. अरबाजने मोठ्या आवाजात निक्कीला चांगलंच सुनावलं. त्याचा राग अनावर झालेला दिसला. आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीत एकमेकांपासून दूरावणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
A टीममध्ये झाली मोठी फूट
'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. अशातच एकमेकांचे घट्ट मित्र असणाऱ्या A टीममध्ये मोठी फूट पडलेली पाहायला मिळतेय. निक्की-अरबाज-घनःश्याम या तिघांच्या मैत्रीत दरी आल्याचं दिसतंय. आता ही धुसफूस आणखी किती वेळ चालणार हे पाहावं लागेल. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागातही आणखी काय राडा होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.