अखेर अन्विता फलटणकरनं त्या त्रासाला कंटाळून घेतली पोलिसात धाव, जाणून घ्या नेमकं काय घडलं ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:42 PM2023-02-25T17:42:48+5:302023-02-25T17:43:17+5:30

Anvita Phaltankar : अन्विता फलटणकर बऱ्याचदा डान्स व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Finally, Anvita Phaltankar got tired of that trouble and ran to the police, know what exactly happened? | अखेर अन्विता फलटणकरनं त्या त्रासाला कंटाळून घेतली पोलिसात धाव, जाणून घ्या नेमकं काय घडलं ते?

अखेर अन्विता फलटणकरनं त्या त्रासाला कंटाळून घेतली पोलिसात धाव, जाणून घ्या नेमकं काय घडलं ते?

googlenewsNext

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून स्वीटूच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ओम स्वीटूचे फॅन्स आजही त्यांना खूप मिस करतात. तिला डान्सची आवड असल्याने तिचे रिल्स सोशल मिडियावर चांगलेच हिट ठरतात. मात्र अन्विता यावेळी डान्समुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

अन्विता ठाण्यात राहते. ती राहत असलेल्या भागात होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदुषणाबाबत तिने थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. ती ठाण्यात जिथे राहते तिथून जवळच्या एका बिल्डिंगमधून सतत मोठ मोठ्याने गाणी लावली जातात. यामुळे प्रचंड ध्वनी प्रदुषण होते. यासंदर्भात अन्विताने दोन वेळा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी फोन केला होता मात्र तिला कोणताही रिस्पॉन्स न मिळाल्याने खंत व्यक्त केली.


अन्विता ज्या ठिकाणी राहते तिथे वयोवृद्ध नागरिक राहतात. त्या भागात हॉस्पिटल देखील आहे. ज्या बिल्डिंगमधून हा कर्णकर्कश आवाज येतो त्यामुळे प्रचंड ध्वनीप्रदुषण होते शिवाय त्याचा त्रास इथल्या सगळ्या नागरिकांना होत असल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे अन्विताने याबाबत काही मार्गदर्शक तत्व असतील तर सांगावीत असे सांगितले.
अन्विताने एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. याआधी याप्रकरणाची तक्रार तिने डिसेंबर २०२२ मध्ये देखील केल्याचे सांगितले. तसेच याबाबत जवळच्या पोलिस ठाण्यातूनही कोणती मदत झाली नसल्याचे सांगितले.

Web Title: Finally, Anvita Phaltankar got tired of that trouble and ran to the police, know what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.