‘सा रे गा मा पा’चा रनरअप राहिलेल्या गायकाची मोदींबद्दल अपमानस्पद पोस्ट, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:30 AM2020-05-29T11:30:31+5:302020-05-29T16:27:40+5:30
पंतप्रधान मोदींविरोधात कथितरित्या अपमानास्पद गीतांची रचना करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
झी बांगला म्युझिकवरच्या ‘सा रे गा मा पा’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबल वादाच्या भोव-यात अडकला आहे. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्रिपुरा पोलिसांना मेनुलविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात कथितरित्या अपमानास्पद गीतांची रचना करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
गुजरातमधील गांधीनगरच्या पंडित दीनदयाल पेट्रोलयिम यूनव्हिर्सटीमधील एका विद्यार्थ्याने मेनुल एहसान नोबल विरोधात ही तक्रार केली. या तक्रार दाखल करणा-या मुलाचे नाव सुमन पाल आहे. सुमन पॉलने ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली. ‘आज मी मेनुल एहसान नोबेलविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचा व्हिसा रद्द केला जावा. त्याच्यासोबतचे सगळे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट रद्द केले जावेत. जेणेकरून तो पुन्हा भारतात यायला नको,’ असे सुमन पॉलने म्हटले आहे.
Today I filed a case against Mainul Ahsan Nobel.I'll request Indian High Commissioner to cancel his visa&cancel all trade agreements with him so that he is not allowed to come to India @PiyushGoyalOffc@PMOIndia@ianuragthakur@PiyushGoyalOffc@Sunil_Deodhar@JPNadda@AmitShahpic.twitter.com/ab0E72Acby
— suman paul (@sumanpaul365) May 25, 2020
सुमनच्या तक्रारीनंतर बांगलादेशी सिंगर मेनुल एहसान नोबेलवर कलम 500, 504, 505 आणि कलम 153 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मेनुल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. यापूर्वी त्याने रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणात अद्याप त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मेनुलने गेल्यावर्षी बांग्ला रिअॅलिटी शो ‘सा रे गा मा पा’ मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती़ तो सेकंड रनर-अप ठरला होता.