आकादीप सैगलचे पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 04:33 PM2017-01-12T16:33:23+5:302017-01-12T16:33:23+5:30

'क्योंकी साँस भी कभी बहु थी' या लोकप्रिय मालिकेत अंश या भूमिकेव्दारे घराघरात पोहचला. या मालिकेनंतर वेगवेगळ्या शोमधून तो ...

Five years after Saigal's appearance, Comeback on the small screen | आकादीप सैगलचे पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक

आकादीप सैगलचे पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक

googlenewsNext
'
;क्योंकी साँस भी कभी बहु थी' या लोकप्रिय मालिकेत अंश या भूमिकेव्दारे घराघरात पोहचला. या मालिकेनंतर वेगवेगळ्या शोमधून तो छोट्या पडद्यावर झळकत राहिला. कुसुम, कुछ इस तरह,कहानी हमारे महाभारत की,तसे फिअर फॅक्टर,झलक दिखला जा 1पर्व,कॉमेडी सर्कसचे 2 पर्व तसेच 2011मध्ये तो बिग बॉसच्या 5व्या पर्वातही झळकला होता.आता पुन्हा आकाशदीप सैगल तब्बल  5 वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. आता तो ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या मालिकेत तो  एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

या मालिकेत आकाशदीप पीर मुहम्मद नेगिटीव्ह भूमिकेत दिसेल.त्याची व्यक्तिरेखा मालिकेच्या कथानकासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण रणजितसिंगच्या जन्माच्या वेळीच शीख सैन्याची पीरच्या सैन्याशी लढाई होते आणि त्यात शीख सैन्यचा विजय होतो. महाराजा रणजितसिंग यांच्या जीवनकथेत पीर मुहम्मद हा पहिला खलनायक असून त्याच्या सैन्याबरोबरच्या लढाईपासून रणजितसिंग यांच्या जीवनप्रवासाची कथा सुरू होते.यासंदर्भात आकाशदीपशी संपर्क साधला असता तो म्हणाला, “मी ही भूमिका स्वीकारली याचं पहिलं कारण हे की आजपर्यंत कोणीच महाराजा रणजितसिंग यांची कथा टीव्ही मालिकेद्वारे सादर केलेली नाही. दुसरं कारण असं की मी निर्मात्यांच्या अगदी खास विश्वासातील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला टीव्ही मालिकेत पुनरागमन करण्यासाठी वाहिनीचा मंच अगदी सुयोग्य आहे, असं वाटलं. या मालिकेत मी पीर मुहम्मदची व्यक्तिरेखा साकारीत असून ती रणजितसिंग यांच्या कथेचा अगदी अविभाज्य भाग आहे. महाराजांच्या जीवनकथेचा आरंभच पीर मुहम्मदपासून होतो.

Web Title: Five years after Saigal's appearance, Comeback on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.