इश्कबाज या मालिकेतील नवीना बोलेचा झाला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 07:39 AM2017-01-24T07:39:49+5:302017-01-24T13:09:49+5:30
इश्कबाज या मालिकेत टीयाची भूमिका साकारत असलेल्या नवीना बोलेचा नुकताच साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे फोटो इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी इन्स्टाग्राम ...
इ ्कबाज या मालिकेत टीयाची भूमिका साकारत असलेल्या नवीना बोलेचा नुकताच साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे फोटो इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. नवीनाचा होणारा नवरा हा इंडस्ट्रीतील नसून तो एक चार्टड अकाऊंटट आहे. करण जीत असे त्याचे नाव असून नवीना आणि करणचा हा प्रेमविवाह आहे. नवीना आणि करणची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. नवीना आणि करणची भेट जीममध्ये दोन वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीला ते दोघे एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स बनले आणि काहीच दिवसांत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीना आणि करणच्या साखरपुड्याला त्या दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. तसेच इश्कबाज या मालिकेतील नवीनाच्या सहकलाकारांनीदेखील साखरपुड्याला हजेरी लावली. तसेच नीती टेलर, सिम्पल कौल या तिच्या इंडस्ट्रीमधील मैत्रिणांनीदेखील तिला साखरपुड्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. नवीनाने साखरपुड्याला ऑरेंज रंगाची सुंदर साडी नेसली होती. यात ती खूपच सुंदर दिसत होती. या साखरपुड्याविषयी नवीना सांगते, "करण हा गेल्या दोन वर्षांपासून माझा खूपच चांगला मित्र आहे. आम्ही दोघे एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो. मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्रासोबत लग्न करत आहे याचा मला अधिक आनंद होत आहे. तो चार्टड अकाऊंटट असल्याने आमच्या दोघांचाही व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे. खरे तर त्याचा माझ्या व्यवसायाशी काहीही संबंध नसला तरी तो माझे काम, माझे कामाचे तास या सगळ्या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो.