'उडान' फेम मीरा देवस्थळेला या गोष्टीची वाटायची भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 09:33 AM2018-03-08T09:33:28+5:302018-03-08T15:03:28+5:30

छोट्या पडद्यावर 'उडान' मालिकेने आपल्या आगळ्या वेगळ्या कथानकामुळे रसिकांचे लक्ष वेधुन घेतले आहे.त्यामुळे सध्या 'उडान'  मालिकेनेही लोकप्रिय मालिकेच्या यादीत ...

'Flying' Fame Mira Devasthale afraid of this thing? | 'उडान' फेम मीरा देवस्थळेला या गोष्टीची वाटायची भीती?

'उडान' फेम मीरा देवस्थळेला या गोष्टीची वाटायची भीती?

googlenewsNext
ट्या पडद्यावर 'उडान' मालिकेने आपल्या आगळ्या वेगळ्या कथानकामुळे रसिकांचे लक्ष वेधुन घेतले आहे.त्यामुळे सध्या 'उडान'  मालिकेनेही लोकप्रिय मालिकेच्या यादीत स्थान मिळवले आहे. मालिकेत काम करता करत ब-याचदा अनेक कलाकारांचे चांगले बॉन्डीग निर्माण होते. असेच काही या मालिकेच्या कलाकरांच्या टीमचे बॉन्डींग चांगले निर्माण झाले आहे.त्यामुळे मालिकेतील कलाकार त्यांना कोणत्या गोष्टी त्रासदायक ठरतात या गोष्टी उघडपणे सांगतात.या मालिकेत गावोगावी होणा-या वेठबिगारीच्या  समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे.


चकोर ही भूमिका साकाराणारी मीरा देवस्थळेने आपल्या अभिनयामुळे सा-यांचे मनं जिंकली आहेत.मात्र अनेकांना माहित नाही की मीरा बिनधास्तपणे आपल्या कॅमे-यासमोर दिसते तिला एकेकाळी दोन लोकांसमोर बोलण्याची भीती वाटायची.ब-याचदा कलाकारांनाही एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटते मात्र कधी अशा गोष्टी बाहेर येत नाहीत.मात्र खुद्द मीरानेच तिचा नेगिटीव्ह पॉईंट सांगितला आहे.याविषयी तिने सांगितले की,“ मला मुळात स्टेट बघताच भीती वाटायची.मी वक्तृत्व स्पर्धांच्या वेळी तर  इतकी भीती घाबरलेले असायचे की, दोन शब्द नीट बोलले तरी खूप असे मला वाटायचे. माझे अशा प्रकारे वाटणा-या भीतीचे मलाच खूप टेंन्शन यायचे. स्वतःला सिद्ध करायचे असेल तर बिनधास्तपणे आपले विचार मांडता यायला गरजेचे आहे हे मला कळत असूनही काय करू हे समजत नव्हते.शेवटी माझ्या एका चांगल्या मित्राने मला एक सल्ला दिला.त्याने सांगितले की, जेव्हा तू स्टेजवर येणार त्यावेळी तुझ्या समोर कोण बसलेले आहे याचा विचार करू नको. समज की आपण एकटेच बोलत आहोत. आपल्या समोर कोणीही नाही असा डोक्यात विचार पक्का कर आणि बिनधास्तपणे बोलायला सुरूवात कर.बघ तुझ्या मनात घर करून असलेली भीती कधी नाहीशी होईल हे तुलाही कळणार नाही.अशा गोष्टी डोळ्या समोर ठेव ज्या तुला नेहमीच प्रेरणा देतात.काही वेळानंतर  मला जाणवले की जेव्हा तुम्ही मंचावर असता तेव्हा ती वेळ फक्त तुमची असते आणि तुम्ही त्याचा वापर करणे गरजेचे असते. लोक तर टाळ्या वाजविणारच असतात.तुमच्या कडून ती 10-15 मिनिटे कोणी काढून घेऊ शकत नाही आणि तेव्हाच ते जग तुमचे असते.”मीरालाम मुळात अभ्यासापेक्षा नृत्य करण्यात आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेण्यात तिला जास्त रस होता.शाळेत असताना,ती नेहमीच आंतरशालेय नृत्य स्पर्धेत सहभागी होत असे आणि डान्स रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याचीही तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले.

Web Title: 'Flying' Fame Mira Devasthale afraid of this thing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.