मेहंदीपासून ते सप्तपदीपर्यंत गोठ फेम राधाने दाखवली लग्नाची एक झलक, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 16:32 IST2022-07-13T16:23:22+5:302022-07-13T16:32:53+5:30
अभिनेत्री रूपल नंदने अनिश कानविंदेसोबत अलीकडेच लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळदीपासून ते सप्तपदीपर्यंतची एक झलक अभिनेत्रीने शेअर केली आहे.

मेहंदीपासून ते सप्तपदीपर्यंत गोठ फेम राधाने दाखवली लग्नाची एक झलक, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री रूपल नंद हिने अलीकडेच लग्नगाठ बांधली. मुंबईच्या अनिश कानविंदे याच्यासोबत रूपलने सप्तपदी घेतली आहे. रूपल च्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यानंतर अभिनेत्रीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. . कुटुंबीय, नातेवाइक आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत रूपलचा विवाह पार पडला.
आता रूपलने तिच्या लग्नाचा मेहंदी, हळदीपासून ते सप्तपदीपर्यंतची एक झलक व्हिडीओच्या माध्यामतून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नातील सुंदर क्षण रूपलने व्हिडीओ एकत्र केलं आहेत. रुपलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोठ या मालिकेतून राधा ही भूमिका साकारात रूपल नंद छोट्या पडद्यावर आली. या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये रुपलने भाग घेतला होता. तिथे सतीष राजवाडे हे परीक्षक होते. त्यांना रुपला अपिअरन्स आवडला आणि त्यांनी तिला मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर अँडस जरा हटके चित्रपटातही तिची भूमिका होती. पण रुपला घराघरात ओळख मिळाली ती गोठ या मालिकेतील राधाच्या भूमिकेनं. गोठ मालिकेत राधाच्या कामाचं कौतुक झालं आणि तिला अनेक मोठ्या कलाकारांबरोबर कामाची संधीही त्यानिमित्ताने मिळाली.