"माझं लग्न मोडल्या दिवसापासूनच...", तेजश्री प्रधान दुसऱ्या लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:03 IST2024-12-23T14:03:01+5:302024-12-23T14:03:50+5:30
Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने लोकमत फिल्मीच्या 'पंचायत' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला.

"माझं लग्न मोडल्या दिवसापासूनच...", तेजश्री प्रधान दुसऱ्या लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत पाहायला मिळत आहे. यात तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांना खूप भावते आहे. तसेच नुकतीच ती 'हॅशटॅग तदैव लग्नम' (Hashtag Tadaiv Lagnam Movie) सिनेमात झळकली आहे. यात तिच्यासोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान तिने लोकमत फिल्मीच्या पंचायतमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सिनेमाशिवाय तिच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला.
तेजश्री प्रधान पुन्हा लग्न करण्याबद्दल म्हणाली की, माझं लग्न मोडल्या दिवसापासूनच मला लग्न करायचंच होतं. मी लग्नासाठीच बनलेले आहे. मला आयुष्यात लग्न करायचंच आहे. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडून गेली म्हणून आता परत ती कधी चांगल्या पद्धतीने घडणार नाही. यावर विश्वास ठेवणारी मी नाहीये. त्यामुळे मला माहिती आहे की, ही गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती होणार आहे. आजही मी त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे.
तेजश्रीने हॅशटॅग तदैव लग्नममधील गायत्रीचा मुलाखतीत उल्लेख करत म्हटले की, त्या गायत्रीसारखंच, प्रत्येक मुलीच्या आतमध्ये तिला ती गोष्ट हवीच असते. वय पुढे जात तसं तुम्हाला जोडीदार हवा असं जास्त वाटू लागते. हो. माझ्याही आयुष्यात ती इच्छा कायम आहे. मला ती गोष्ट आजही करायला आवडणार आहे. काहीतरी आयुष्यात घडून गेलंय म्हणून माझे विचार बदललेत किंवा आता मला ती गोष्ट करायची नाही, असे नाहीये. म्हणून मी मगाशी म्हणाले की, आपल्याकडे तर्क लावण्याची खूप वाईट सवय आहे की हा हिला आता लग्न करायचंच नसेल. तिला बाहेर पडायचंच नसेल. पण मला वाटते आपण बाहेर पडतो. एका मर्यादेनंतर तुम्ही त्यातून बाहेर पडता. हा मानवी स्वभाव आहे. त्यात काहीच चुकीचे नसते. तुम्ही तुमच्यासाठी करेक्ट असतात.
एखाद्या व्यक्तीचं अजून लग्न झालं नाही म्हणजे ती त्यात अडकून पडली आहे, असे नाही. आपण त्यातून खूप पुढे निघून जातो. पण पुन्हा म्हणेन नशीबावर अवलंबून असतं. ते जेव्हा व्हायचं आहे तेव्हा ते होणार आहे, ते होणार तेव्हा मी आनंदाने स्वीकारणार आहे, पण ते होत नसेल तर ते होईपर्यंत मी दुःखात बसणार नाहीये, असे तेजश्री म्हणाली.