'गुन्हेगार'मध्ये सप्सेंस थ्रिलर दिसणार गजराज राव, श्वेता बासू प्रसाद आणि सुमित व्यास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:02 IST2022-09-14T16:57:42+5:302022-09-14T17:02:44+5:30
'गुन्हेगार'मध्ये अभिनेता गजराज राव, तसेच श्वेता बासू प्रसाद आणि सुमित व्यास यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

'गुन्हेगार'मध्ये सप्सेंस थ्रिलर दिसणार गजराज राव, श्वेता बासू प्रसाद आणि सुमित व्यास
झी थिएटर गुन्हेगार नावाचा सप्सेंस थ्रिलर तुमच्या भेटीला येत आहे. सप्सेंस थ्रिलर ड्रामामध्ये पत्रकार, पोलिस आणि सर्वसामान्य माणूस या तीन महत्वपूर्ण पात्रांच्या जीवनांमध्ये गुन्हा आणि सूडाच्या नाट्याचा थरार आढळतो. आकर्ष खुरानांचे दिग्दर्शन असलेल्या गुन्हेगारमध्ये अभिनेता गजराज राव, तसेच श्वेता बासू प्रसाद आणि सुमित व्यास यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.
अभिनेता गजराज राव म्हणाले, ”जेव्हा आकर्षने ही संकल्पना मला सांगितली तेव्हा मला कथानक अतिशय आवडले. आकर्षचे थिएटरशी असलेले नाते अतूट आहे आणि लहान स्क्रीनसाठी बारकावे जपत थिएटर कसे व्यक्त करायचे याची त्याला चांगली कल्पना आहे. मी दिल्लीमध्ये थिएटर करत असे, पण मुंबईला आल्यावर मला त्यात संधी मिळाली नाही. हा टेलि प्ले अगदी स्टेज शो सारखाच आहे, पण तो टेलिव्हिजनवर सादर केला जाणार आहे. मी यात सामिल होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे अनेक वर्षांपासून आजपर्यंत झी थिएटर टीम टेलिव्हिजनच्या प्रेक्षकवर्गासाठी थिएटर आणण्याच्या दृष्टिने अथक परिश्रम करत आहे. या वास्तवात अगदी आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा भाग बनण्याची ही अतिशय परफेक्ट संधी असल्यासारखे मला वाटले.”
आपल्या पात्राबद्दल बोलताना श्वेता बासू प्रसाद म्हणाली, “यात मी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेने मलाच भुरळ पाडली आहे. तिचे अनेक पैलू आहेत; ती कठोर, आशावादी आणि समर्पण करणारी आहे. ती नक्की काय आहे याचा निर्णय घेणे अतिशय कठीण आहे. मृणालिनी आणि तिच्या गुंतागुंतींचा शोध घेणे अतिशय सुखावह अनुभव होता.”
“संपूर्ण सेटला दिलेली ट्रिटमेंट आणि शूट मला अधिक आकर्षक वाटले. सुरुवातीला मला तेवढी खात्री वाटत नव्हती, कारण टेलिप्लेमध्ये काम करण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण जसजसे आम्ही प्लेच्या समापनाकडे जात होतो, तसतसा मला अधिकाधिक रस निर्माण व्हायला लागला. हा प्ले प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणार आहे.” असे सुमित व्यास म्हणाला.