गणेश आचार्यला पाहाल तर थक्क व्हाल; कपिल शर्मा म्हणाला,दो आदमी गायब कर दिए आपने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:38 AM2020-12-16T11:38:05+5:302020-12-16T11:38:43+5:30
लवकरच गणेश आचार्य ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसणर आहे. त्यापूर्वी या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यात गणेशला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्यचे नवे फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. फोटो पाहिल्यावर तुम्ही त्याला ओळखूही शकणार नाही. इतका तो बदललाय. सध्या प्रत्येकजण गणेशला बघून त्याचे कौतुक करतोय. लवकरच गणेश आचार्य ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसणर आहे. त्यापूर्वी या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यात गणेशला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. होय, गणेशने 10-12 किलो नाही तर तब्बल 98 किलो वजन कमी केले.
प्रोमोमध्ये वजनावरून कपिल शर्मा गणेशची मजा घेताना दिसतोय. ‘मास्टरजी कितना वेट कम लिया आपने?’ असे कपिल त्याला विचारतो. यावर 98 किलो असे उत्तर गणेश देतो. यावर कपिल त्याची मजा घेतो. ‘छोटे छोटे शहरों मे 40-40 किलो के आदमी होते हैं, दो आदमी गायब कर दिए आपने,’ असे कपिल म्हणतो. यावर गणेशसह सेटवरचे सगळेच हसताना दिसतात.
गणेश आचार्यसोबत शोमध्ये कोरिओग्राफर टेरेंस लुईस आणि गीता कपूरही दिसणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना आपल्या तालावर थिरकायला लावणारा प्रसिद्ध कोरियोग्राफर अर्थात नृत्य दिग्दर्शक म्हणजे गणेश आचार्य. घरातूनच त्याला नृत्यदिग्दर्शनाचा वारसा मिळालाय. त्याचे वडील कृष्ण गोपी हे देखील कोरिओग्राफर म्हणून प्रसिद्ध होते. बहीण कमलकडून त्याने नृत्याचे धडे गिरवले. अवघ्या 19 व्या वर्षी कोरियोग्राफर म्हणून त्याने कामाला सुरूवात केली. 1992 साली आलेल्या ‘अनाम’ चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम करण्याची त्याला संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गणेश आचार्यप्रमाणे त्याच्या पत्नीनेही बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव विधी आचार्य असं आहे.
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या भाग मिल्खा भाग चित्रपटातील हवन करेंगे हवन करेंगे या गाण्यातील नृत्य निर्देशनासाठी त्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. भारी भक्कम शरीर असूनही त्याच्या नृत्यावर काही परिणाम झाला नव्हता. परंतू सध्या बॉलिवूडमध्ये वजन कमी करण्याची जणू स्पर्धाच लागल्याने गणेशनेही वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात तो यशस्वीही ठरला.