टीव्ही कलाकारांनी गणरायाचे जल्लोषात केले स्वागत, बाप्पा भक्तीत झाले लीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 11:00 AM2021-09-10T11:00:00+5:302021-09-10T11:00:00+5:30
घराघरामध्ये बाप्पाचे आगमन झाले आहे. आपले आवडते कलाकारही बा्प्पा भक्ती करण्यात दंग झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुंडली भाग्यमधील मानसी श्रीवास्तव आणि संजय गगनानी, तेरी मेरी इक जिंदडीमधील अमनदीप सिद्धू, भाग्य लक्ष्मीमधील पारूल चौधरी, मीतमधील आशी सिंग आणि शगुन पांडे, कुमकुम भाग्यमधील पूजा बॅनर्जी आणि अपना टाईम भी आयेगामधील विवाना सिंग हे ह्या उत्सवाच्या आपल्या आवड
'कुंडली भाग्य'मधील सोनाक्षीच्या भूमिकेतील मानसी श्रीवास्तवने सांगितले की, "मी मुंबईमध्ये एकटीच राहते त्यामुळे माझ्या चित्रीकरणातून बाप्पाच्या आगमनाची तयारी करायला पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र माझ्या मित्रांच्या घरी बाप्पाचे दर्शन घ्यायला जायला आवडते. ह्यावर्षीही कुंडली भाग्यच्या चित्रीकरणातून वेळ काढून मी दर्शनाला जाईन. ह्या उत्सवाच्या वेळेस सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो मला आवडतो. जोष, जल्लोष, नृत्य आणि उत्साह डोळ्यांचे पारणे फेडतो. मला विसर्जनाला जायलाही आवडते आणि मुंबईच्या रस्त्यांवर नाशिक ढोल आणि अन्य बॅन्डबाज्यांवर वर लोकांना थिरकताना पाहायला आवडते. सध्या हे सगळे सेलिब्रेशन मिस करत असलो तरी कोविडमुळे आपण ते कमी प्रमाणातच ठेवायला हवे. अर्थात उत्सवाचा उत्साह कमी न करता बाप्पाचे प्रेमाने स्वागत करूया."
'भाग्यलक्ष्मी'मधील करिष्मा ओबेरॉयची भूमिका करणारी पारूल चौधरी म्हणाली, "गणेश चतुर्थी सकारात्मक भावना घेऊन येते. गणपती बाप्पा विघ्नहर्ता असून मी रोज सकाळी त्याची प्रार्थना करते. आपल्याला ह्या कोविडमधून बाहेर काढावं ही एकच प्रार्थना बाप्पाकडे आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि आर्थिकदृष्ट्या ते झगडत आहेत. मला आशा आहे आणि मी प्रार्थना करते की जगात सगळं काही ठीक होईल."
'मीत'मध्ये मीतची भूमिका करणारी आशी सिंग म्हणाली, "खरंतर मला भारतातील सगळेच सण आवडतात आणि गणेशोत्सवाचे तर माझ्या हृदयात खास स्थान आहे. हे माझ्यासाठी विशेष आहे कारण गेल्या वर्षी मी नवस बोलले होते की जर मी माझे स्वतःचे घर घेऊ शकले तर घरी गणपती बाप्पाला आणेन आणि ह्यावर्षी सुदैवाने मी घर घेऊ शकले. जणू बाप्पाने माझे स्वप्नच पूर्ण केले. रात्री उशीरा गणेशोत्सव मंडपांना भेट द्यायला मला आवडलं असतं पण सामाजिक एकत्र येण्यावर निर्बंध आहेत आणि कोविड19 साठीचे नियम लागू आहेत त्यामुळे आपण आपल्यातच हा सण साजरा करायला हवा. असे असले तरी मी सर्वांना ह्या उत्सवाच्या शुभेच्छा देते बाप्पा तुमच्यासाठी खूप सारे प्रेम शक्ती आणि आनंद प्रदान करो."
'कुमकुम भाग्य'मध्ये रिहाची भूमिका करणारी पूजा बॅनर्जी म्हणाली, "अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसताना ह्यावर्षी गणेशोत्सव नेहमीपेक्षा वेगळा असेल. ह्यावर्षी मी दर्शनासाठी घराबाहेर पडणार नसले तरी घरी निश्चितपणे गणपती बाप्पाची पूजा करेन. मला मोदकही आवडतात त्यामुळे मी घरी बनवेन आणि त्यांचा आस्वाद घेईन. ह्यावर्षी सेलिब्रेशन वेगळे असले तरी उत्साह मात्र तेवढाच असेल. लहानपणापासूनच मला हा सण आवडत आला आहे. बाप्पाची मुर्ती घरी आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत मी दरवर्षी नुसती नाचायचे. नागपुरला आमच्या घरी बाप्पाला आणताना मी ढोलही वाजवायचे. मुंबईतही गणेशोत्सव अतिशय छान पद्धतीने साजरा केला जातो जिथे सगळे एकत्र येतात आणि मग मित्रांच्या घरी दर्शनासाठी जातात. ह्यावर्षी आपण हे सगळे मिस करणार आहोत पण तरीही मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की ह्यावर्षी ही सगळे विघ्ने बाप्पाने घालवून टाकावीत."
'अपना टाईम भी आयेगा'मध्ये महारानी राजेश्वरीची भूमिका करणारी विवाना सिंग म्हणाली ,"माझ्या घरी गणपती नसतो पण मी माझ्या खास मैत्रिणीच्या घरी जाते. तिकडे अख्खा दिवस राहते. ह्या उत्सवाबद्दल मला एक गोष्ट आवडते आणि ती म्हणजे त्या मुर्तीशी सजावटीशी आणि बाप्पासाठी बनवलेल्या प्रसादासोबत आपले एक नाते बनून जाते. माझे बाप्पासोबत खूप छान नाते असून मी त्याला राखीही बांधते आणि 'गणू भैय्या' अशी हाक मारते कारण मी शंकर भगवान यांची भक्त आहे त्यामुळे गणपतीबाप्पा माझा भाऊच असल्याची भावना माझ्या मनात आहे. मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे आहे आणि गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असा माझा विश्वास आहे.