"मला गणपती बाप्पाने बनवलंय कॅप्टन"; गोलीगत सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:29 PM2024-09-06T12:29:56+5:302024-09-06T12:30:22+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : या आठवड्याचा कॅप्टन बनण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. तो कॅप्टन झाल्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदी आहेत.

"Ganpati Bappa made me Captain"; Sentiments expressed by Goligat Suraj Chavan | "मला गणपती बाप्पाने बनवलंय कॅप्टन"; गोलीगत सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना

"मला गणपती बाप्पाने बनवलंय कॅप्टन"; गोलीगत सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच सदस्यांना बिग बॉसच्या घरात दाखल होऊन ४० दिवस उलटले आहेत. अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर हे सदस्य कॅप्टन झाल्यानंतर आता या आठवड्याचा नवा कॅप्टन झाला आहे सूरज चव्हाण (Suraj Chavan). तो कॅप्टन झाल्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदी आहेत. कॅप्टन सूरज आज कॅप्टनसीबद्दल अंकिता, निक्की, अरबाज, वैभवसोबत चर्चा करताना दिसणार आहे. दरम्यान "मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं", असं म्हणताना सूरज दिसणार आहे.

सूरज चव्हाणला या आठवड्याचा कॅप्टन पदाचा मान मिळाला आहे. त्याच्या कॅप्टन्सीबद्दल चर्चा होताना सूरज निक्कीला म्हणतोय,"तू काही चुका करू नकोस". त्यावर निक्की त्याला नाही करणार असं म्हणते. निक्की म्हणते की,"तुझ्या कॅप्टन्सीसाठी माझा सगळ्यात मोठा पाठिंबा होता". तर अंकिता मध्येच म्हणते,"मी मात्र झोपणार". त्यावर सूरज म्हणतो,"तुला विनंती करतो की झोपू नकोस". अंकिता पुढे म्हणते,"मला बुक्कीत टेंगुळ दिलं आहेस". सूरज म्हणतो,"मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवले आहे". 

बिग बॉस मराठीच्या घरात सूरज जुळवतोय यमक
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सूरज चव्हाण आज सर्वाधिक चर्चेत आहे. आजच्या भागात सूरज नवे डायलॉग बनवताना दिसणार आहे. या डायलॉगमध्ये त्याला पॅडी दादादेखील मदत करत आहेत. यमक कसं जुळवायचं हे पॅडी दादा सूरजला सांगताना दिसणार आहेत.


याच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

Web Title: "Ganpati Bappa made me Captain"; Sentiments expressed by Goligat Suraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.