शिवानी सुर्वेच्या मालिकेत गार्गी फुलेंची एन्ट्री, 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:02 PM2024-06-17T17:02:06+5:302024-06-17T17:02:59+5:30

'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत अभिनेत्री गार्गी फुले यांनी एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

gargi phule to play important role in shivani surve thod tuz thod maz new marathi serial | शिवानी सुर्वेच्या मालिकेत गार्गी फुलेंची एन्ट्री, 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये दिसणार 'या' भूमिकेत

शिवानी सुर्वेच्या मालिकेत गार्गी फुलेंची एन्ट्री, 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये दिसणार 'या' भूमिकेत

गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर देखील 'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर परांजपेबरोबर कोणते कलाकार दिसणार याचा उलगडा झाला आहे. 

'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत अभिनेत्री गार्गी फुले यांनी एन्ट्री घेतली आहे. गार्गी फुले या सुप्रसिद्ध दिवंग अभिनेता निळू फुले यांची लेक आहे. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आता पुन्हा 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. या मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत गार्गी फुले रजनी हे पात्र साकारणार आहेत. याआधी त्या राजा राणीची गं जोडी, इंद्रायणी या मालिकांमध्ये दिसल्या होत्या. त्यांनी काही सिनेमांतही काम केलं आहे. 

शिवानी सुर्वे, समीर परांजपे आणि मानसी कुलकर्णी  मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेत मानसी घाटे, ओमप्रकाश शिंदे, पोर्णिमा तळवलकर, अमोघ चंदन, अंजली जोगळेकर, शर्वरी पेठकर, माधवी सोमण, हे कलाकार झळकणार आहेत. १७ जून म्हणजे आजपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. 

Web Title: gargi phule to play important role in shivani surve thod tuz thod maz new marathi serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.