'गाथा नवनाथांची' फेम नकुल अन् जयेश दत्तगुरुंच्या चरणी लीन; अभिनेत्यांनी घेतलं नरसोबाच्या वाडीचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 15:56 IST2023-11-26T15:55:30+5:302023-11-26T15:56:05+5:30
Gatha Navnathanchi: मालिकेत जयेश शेवाळकर मच्छिन्द्रनाथांची भूमिका साकारत आहे.तर, नकुल घाणेकर गोरक्षनाथ आणि महादेव यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

'गाथा नवनाथांची' फेम नकुल अन् जयेश दत्तगुरुंच्या चरणी लीन; अभिनेत्यांनी घेतलं नरसोबाच्या वाडीचं दर्शन
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे गाथा नवनाथांची. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रत्येक भाग लोकप्रिय होताना दिसत आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा साजेसा अभिनय यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अलिकडेच या मालिकेच्या संपूर्ण टीमने नरसोबाची वाडी येथे जाऊन दर्शन घेतलं.
२५ नोव्हेंबर रोजी गोरक्षनाथ यांचा प्रकटदिन असतो. त्यामुळे या दिवसाचं निमित्त साधत अभिनेता जयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर यांनी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथील देवस्थानात जाऊन दर्शन घेतले. याबरोबरच मंदिरात त्यांनी पूजाही केली. या मालिकेत जयेश शेवाळकर मच्छिन्द्रनाथांची भूमिका साकारत आहे.तर, नकुल घाणेकर गोरक्षनाथ आणि महादेव यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, लवकरच ही मालिका ८०० भागांचा टप्पा पूर्ण करणार आहे. सध्या या मालिकेत नागनाथ आणि गुरुआई यांच्यातील युद्ध पाहायला मिळते आहे. तसंच मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महान कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळालं आहे.