कुशाल टंडनमुळे गौहर खानची वाढली डोकेदुखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 07:40 AM2017-02-16T07:40:24+5:302017-02-16T13:10:24+5:30
गौहर खान आणि कुशाल टंडन या एक्स-लव्हर्सचे पुन्हा पॅचअप होणार की काय? अशी चर्चा अलीकडे रंगली. याचे कारण होते, कुशालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला गौहरचा हॉट फोटो. पण कुशालने शेअर केलेल्या याच फोटोमुळे गौहर अडचणीत आलीय. केवळ अडचणीतच नाही तर यामुळे गौहरचा खोटारडेपणाही उघड झाला आहे.
ग हर खान आणि कुशाल टंडन या एक्स-लव्हर्सचे पुन्हा पॅचअप होणार की काय? अशी चर्चा अलीकडे रंगली. याचे कारण होते, कुशालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला गौहरचा हॉट फोटो. पण कुशालने शेअर केलेल्या याच फोटोमुळे गौहर अडचणीत आलीय. केवळ अडचणीतच नाही तर यामुळे गौहरचा खोटारडेपणाही उघड झाला आहे.
कुशालने शेअर केलेल्या फोटोत एका मॅगझिनचे मास्टहेडही दिसत होते. यावरून गौहर या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणार, असा अंदाज बांधला गेल्या होता. कुशालने गौहरचा हा फोटो शेअर करताना तिची वारेमाप स्तूती केली होती. गौहरचा हा फोटो माझा भाऊ हैदरने काढलेला आहे. हा फोटो पाहिला आणि या स्टनरचा फोटो शेअर करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. गौहर खान ही सोन्यासारख्या नितळ मनाची, आकर्षक व स्टाईलिश तरूणी आहे, असे कॅप्शन कुशालने या फोटोला दिले होते. हे कॅप्शन वाचून गौहरही चांगलीच हुरळली. यासाठी तिने कुशालचे खास आभारही मानले. पण यानंतर या प्रकरणात टिष्ट्वस्ट आला.
संबंधित मॅगझिनने हा फोटो पाहून लगेच नाराजीचा सूर आवळला. गौहर खान या महिन्याच्या आमच्या अंकाची कव्हर गर्ल नाहीय. गौहरने मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. मुलाखतही दिली होती. मात्र ते फोटोशूट कव्हर पेजसाठी नव्हते. काही चाहत्यांनी गौहरचा हा फोटो आमच्या मॅगझिनच्या मास्टहेडसह डिझाईन केला आणि कुशालने तो शेअर केला. असे व्हायला नको. किमान गौहरने तरी हे रोखायला हवे, असे मॅगझिनने जाहिर करून टाकले. शिवाय यासंदर्भात कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.
आता गौहर यावर का संदर्भात काय पाऊल उचलते, ते बघूच!!