Gauri Kulkarni Accident: आई कुठे काय करते फेम गौरीच्या स्कुटरला अपघात; पायाला गंभीर दुखापत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:34 PM2023-03-19T12:34:25+5:302023-03-19T12:34:48+5:30

बाईकस्वार चुकीच्या दिशेने येत होता, त्याची गौरीच्या स्कूटरला धडक बसली होती.

Gauri Kulkarni Accident: Aai Kuthe Kay Karte actress Gauri Kulkarni leg injured after scooter Accident few days back | Gauri Kulkarni Accident: आई कुठे काय करते फेम गौरीच्या स्कुटरला अपघात; पायाला गंभीर दुखापत 

Gauri Kulkarni Accident: आई कुठे काय करते फेम गौरीच्या स्कुटरला अपघात; पायाला गंभीर दुखापत 

googlenewsNext

सध्या समस्त मराठी प्रेक्षकांचे आकर्षण असलेली मालिका आई कुठे काय करतेमधील अभिनेत्री गौरी म्हणजेच गौरी कुलकर्णी हिच्या स्कूटरला नुकताच मोठा अपघात झाला आहे. रस्त्यावरून जात असताना तिच्या स्कुटरला बाईकस्वाराने समोरून धडक दिली आहे. यामध्ये तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

पायाला जबर मार लागल्याने गौरी पुढील तीन आठवडे तरी मालिकेपासून दूर असणार आहे. मालिकेत गौरी ही अरुंधतीची होणारी सुन म्हणजेच यशची प्रेयसी दाखविण्यात आली आहे. संजनाच्या बहीणीची मुलगी दाखविल्याने तिची भूमिका देशमुखांच्या घरात महत्वाची आहे. 

गौरीने टाईम्स ऑफ इंडियाला अपघाताबाबत कळविले आहे. बाईकस्वार चुकीच्या दिशेने येत होता, त्याची गौरीच्या स्कूटरला धडक बसली होती. यामुळे गौरीची स्कूटर घसरली आणि तिच्या पायाला दुखापत झाली आहे. गौरीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे डॉक्टरांनी तिला तीन आठवड्यांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. हा अपघात काही दिवसांपूर्वी घडला आहे. 

या अपघातात गौरीच्या स्कूटरचेही मोठे नुकसान झाले आहे. गौरी आणखी एका मालिकेत काम करत आहे. ती आता पुढील काही दिवस दिसणार नसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Web Title: Gauri Kulkarni Accident: Aai Kuthe Kay Karte actress Gauri Kulkarni leg injured after scooter Accident few days back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.