गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 06:00 IST2018-09-10T14:32:00+5:302018-09-11T06:00:00+5:30

'सूर राहू दे' या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.

Gauri Nalawade and Sangram Salvi will be seen together for the first time on a small screen | गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर

गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर

ठळक मुद्दे 'सूर राहू दे'मध्ये दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा 'सूर राहू दे' 1 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला


'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गौरी नलावडे व 'देवायनी' मालिकेत 'तुमच्यासाठी कायपण' या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. हे दोघे झी युवावर दाखल होणारी 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

झी युवा वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या मालिकेतून मनोरंजन करत आहेत. त्यात आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सूर राहू दे' या मालिकेत दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात प्रसारीत होणार आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. गौरी एक साध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल मुलगा साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा प्रोमो पाहिला असता त्यात गौरी एका खानावळीत काम करताना दिसते आणि संग्रामला त्या खानावळीतील जेवण आवडते म्हणून तो वेटरला टीप द्यायला जातो. पण दुसरीकडे गौरी त्याला अडवून पैशापेक्षा दोन कौतुकाचे बोल जास्त महत्वाचे आहेत असे सांगते. प्रोमोने प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिघेला नेली आहे. भावनिकता आणि व्यवहारिकता यांची सांगड घालणारी ही कथा 'सूर राहू दे' या मालिकेद्वारे 1 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 7 वाजता ही मालिका पाहता येणार आहे.


 
 

Web Title: Gauri Nalawade and Sangram Salvi will be seen together for the first time on a small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.