'रमा राघव' मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:04 PM2023-10-23T17:04:02+5:302023-10-23T17:04:36+5:30

Gautam Joglekar : ‘रमा राघव’ या मालिकेतील गिरीश परांजपे म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे समजते आहे.

Gautam Joglekar took a break from the 'Rama Raghav' series, the big reason came to light | 'रमा राघव' मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

'रमा राघव' मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रमा राघव’(Rama Raghav)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही तितिकीच चर्चेत आहे. सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना,रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदलल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेतील गिरीश परांजपे म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतल्याचे समजते आहे. 

रमा राघवच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात गौतम जोगळेकर यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तर त्यांच्या जागी आता गिरीश परांजपेंच्या भूमिकेत श्रीरंग देशमुख पाहायला मिळत आहेत. श्रीरंग देशमुख आणि गौतम जोगळेकर हे चांगले मित्र आहेत. या व्हिडीओमधून कारण स्पष्ट होते की, गौतम जोगळेकरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याची सर्जरी करायची असल्यामुळे त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला. 


गिरीश परांजपे या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. तसेच आता रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे श्रीरंग देशमुख हे त्यांचे मित्र असून त्यांनाही तितकंच प्रेम द्या असं गौतम जोगळेकर यांनी प्रेक्षकांना आवाहन केले आहे.

Web Title: Gautam Joglekar took a break from the 'Rama Raghav' series, the big reason came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.