लग्नाच्या ५ वर्षांनंतर अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, म्हणाली, 'PCOD मुळे खात्री नव्हती...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 02:53 PM2023-04-11T14:53:11+5:302023-04-11T14:53:56+5:30
PCOD असल्याने आपण गरोदर होऊ की नाही याची तिला खात्री नव्हती
टेलिव्हिजनवरील 'सरस्वतीचंद्र' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता गौतम रोडे (Guatam Rode) बाबा होणार आहे. गौतमची पत्नी पंखुरी अवस्थी (Pankhuri Awasthi) गरोदर असून दोघांनी चाहत्यांसोबत ही गुडन्युज शेअर केली आहे. खरं तर दोन वर्षांपासून ते बाळासाठी प्रयत्न करत होते मात्र पंखुरीला PCOD असल्याने आपण गरोदर होऊ की नाही याची तिला खात्री नव्हती असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.
गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी यांनी 2018 मध्येच लग्नगाठ बांधली. 'सूर्यपूत्र कर्ण' या मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. गौतम पंखुरीपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. आता ५ वर्षांनी दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. ही आनंदाची बातमी देताना गौतम म्हणाला,'आमचं संपूर्ण कुटुंब खूपच आनंदीत आहे. आमच्या दोघांचे आई वडील या गुडन्यूज कधीपासून वाट बघत होते. मी आता बाबा होणार याचा मला खूपच आनंद शब्दात मांडता येणारा नाही. पंखुरी रोज बाळाशी बोलते. आम्ही रोज बाळासाठी प्रार्थना करतो.'
तर पंखुरी म्हणाली,'लग्नाच्या दोन वर्षातच बाळ व्हावे अशी आमची खूप इच्छा होती. मात्र मी PCOD चा सामना करत होते. पाळीच्या अनियमिततेपणामुळे मी प्रेग्नंट होईल की नाही याची मला खात्री नव्हती. म्हणून आम्ही हे नशीबावर सोडले होते. डिसेंबरमध्ये मी मॅडम सर मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त होते तेव्हा माझी पाळी चुकली. पण मी फार लक्ष दिलं नाही. शुटिंग सुरु ठेवले. मात्र एक आठवडा उलटला तरी पाळी न आल्याने मी प्रेग्नंसी टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली. मला खूप आनंद झाला.'
पंखुरी आणि गौतम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांचे फोटो व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. एकमेकांच्या बिझी शेड्युलमधून ते एकमेकांसाठी वेळ काढतात. लवकरच बेबीमून साठी ते उदयपूरला जाणार आहेत.सध्या पंखुरी ६ महिन्यांची गर्भवती आहे.