गौतमी पाटीलची अशोक सराफ व निवेदिता यांच्यासोबत दिली खास पोझ, PHOTO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:16 IST2025-03-21T18:15:54+5:302025-03-21T18:16:14+5:30

गौतमी पाटीलने अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याबरोबरचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Gautami Patil Shere Photos With Ashok Saraf And Nivedita Saraf Siddharth Jadhav | गौतमी पाटीलची अशोक सराफ व निवेदिता यांच्यासोबत दिली खास पोझ, PHOTO VIRAL

गौतमी पाटीलची अशोक सराफ व निवेदिता यांच्यासोबत दिली खास पोझ, PHOTO VIRAL

Gautami Patil: 'सबसे कातील गौतमी पाटील' (Sabse Katil Gautami Patil) असं म्हणत लावणी डान्सर गौतमी पाटीलचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. गौतमी पाटीलचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. गौतमी तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक व्हिडिओ आणि फोटो गौतमी शेअर करताना दिसते. आता गौतमीने काही खास फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेत आले आहेत.

गौतमीने इन्स्टाग्रामवर दिग्गज अभिनेते अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गौतमी प्रचंड आनंदी दिसतेय. यासोबतच गौतमीने सिद्धार्थ जाधव, विशाल निकम, अमर जाधव यांच्याबरोबरही खास पोझ दिल्यात. गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  हे फोटो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५'  ( Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्यामधील आहेत. या सोहळ्यात  गौतमीची खास अदाकारी दिसली.



गौतमी पाटील आता मराठी सिनेसृष्टीत सुद्धा सक्रिय झाल्याची पाहायला मिळतेय. गौतमीने गेल्या काही महिन्यांमध्ये 'लाइक आणि सबस्क्राइब', 'मूषक आख्यान', 'महाराष्ट्र फाइल्स' अशा मराठी सिनेमांमध्ये खास नृत्य केलंय. तसेच तिनं  'आता होऊ दे धिंगाणा ३'मध्येही सहभाग नोंदवला होता. गौतमीच्या खेचक अदा आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने तिने संपूर्ण महाराष्टाला वेड लावलेलं आहे. दिवसेंदिवस गौतमीचे कार्यक्रम आणि लोकप्रियता वाढत चालली आहे. 

Web Title: Gautami Patil Shere Photos With Ashok Saraf And Nivedita Saraf Siddharth Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.