‘जीजी माँ’- अदृष्य प्रेमाच्या बंधाने जखडलेल्या दोन बहिणींची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 05:31 AM2017-10-07T05:31:57+5:302017-10-07T11:01:57+5:30
आपली बहीण ही केवळ आपली मैत्रीणच नसते, तर आपले म्हणणे ऐकून घेणारी, आपल्याला पाठिंबा देणारी आणि जिच्याबरोबर आपण आपली ...
आ ली बहीण ही केवळ आपली मैत्रीणच नसते, तर आपले म्हणणे ऐकून घेणारी, आपल्याला पाठिंबा देणारी आणि जिच्याबरोबर आपण आपली सुख-दु:ख वाटू शकतो अशी आपली विश्वासू जोडीदारही असते.तुमची मोठी बहीण ही जगातील तुमची पहिली मैत्रीण असते आणि पुढे ती तुमच्या आईची जागा घेते. मानवी नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या आपल्या नव्या ध्येयानुसार राजस्थानमधील जयपूरमध्ये राहणा-या फाल्गुनी आणि नियती पुरोहित या दोन बहिणींची कथा सादर करणार आहे. दोघा बहिणींमधील मोठी असलेली फाल्गुनी ही प्रेम आणि त्यागाचे प्रतीक असते. मालिकेतील प्रमुख खलनायिका असलेल्या उत्तरादेवी रावत यांच्या सा-या जाचाला ती पुरून उरते. आपली धाकटी बहीण नियतीच्या रक्षणासाठी फाल्गुनी आपल्या प्राणांचीही पर्वा करत नाही.परंतु नियतीच्या क्रूर विधिलिखितामुळे या दोन भगिनींमधील सशक्त आणि नि:स्वार्थी भगिनीप्रेमाचा बंध तुटण्याची वेळ येते. उत्तरादेवी फाल्गुनीला न जुमानता नियतीची माता बनते. तेव्हा फाल्गुनीवर दोनपैकी एक पर्याय स्वीकारण्याची अवघड वेळ येते. तिला आपल्या धाकट्या बहिणीची माता बनण्याच्या संधीवर पाणी सोडावे लागते. या अंतिम त्यागासाठी फाल्गुनी तयार होते का? हे नवी मालिका ‘जीजी माँ’मध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहे. येत्या 9 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. ‘जय प्रॉडक्शन्स’ने या मालिकेची निर्मिती केली असून या कंपनीचे जय आणि किन्नरी मेहता यांनी या मालिकेविषयी आपले विचार व्यक्त करताना सांगितले,“भारतातील टीव्हीवर मानवी नातेसंबंधांवर आधारित मालिकांना नेहमीच चांगलं यश मिळत गेलं आहे. आता 'जीजी माँ' मालिकेकतही फाल्गुनी आणि नियती या दोन बहिणींमध्ये विविध भावनांचा पाट वाहताना दिसेल. यात फाल्गुनीला दुहेरी भूमिका साकारावयाची असून त्यामुळे ऐन वेळी ती तिच्यापुढील आव्हानाला यशस्वीपणे सामोरी जाते. या दोन बहिणींमधील प्रेमाचं आणि आपलेपणाचं जे सुंदर नातं आहे, ते प्रेक्षकांचं मन नक्कीच काबीज करील. या मालिकेत पल्लवी प्रधानने पहिल्यांदा नकारात्मक भूमिका रंगवली असून तिचं हे रूप प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच पाहिलेलं नाही.”‘जीजी माँ’ मालिकेची पटकथा मयूर पुरी (चित्रपट- ‘ओम शांती ओम’ आणि ‘हॅपी न्यू ईयर’) या बॉलिवूडच्या प्रसिध्द पटकथालेखकाने लिहिली असून रोहितराज आनंद यांनी (दिग्दर्शन- ‘दिया और बाती हम’ मालिका) दिग्दर्शन केले आहे. उत्तरादेवीच्या भूमिकेत पल्लवी प्रधान असून तिचे पती जयंत रावत यांच्या भूमिकेत राजीव पॉल झळकणार आहे. याशिवाय सुयश रावतच्या भूमिकेत दिशंक अरोरा आणि विधान रावतच्या भूमिकेत सुभाशीष झा झळकणार आहेत.