घाडगे & सून मालिकेत अक्षय आणि अमृतामध्ये मैत्रीची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 09:00 AM2017-10-25T09:00:49+5:302017-10-25T14:30:49+5:30
घाडगे & सून मालिकेत अक्षय आणि अमृताचे लग्न कुठल्या परिस्थितीत झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अक्षयने अमृताला वचन ...
घ डगे & सून मालिकेत अक्षय आणि अमृताचे लग्न कुठल्या परिस्थितीत झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अक्षयने अमृताला वचन देखील दिले की, तो तिला काही महिन्यामध्येच या लग्नबंधनामधून मुक्त करेल. दुसरीकडे अमृता माईना मनविण्यासाठीचे सगळे प्रयत्न करते आहे. परंतु लग्न झाल्यापासून अक्षय कियाराच्या शोधात आहे. अमृताला ही गोष्ट माहिती असून ती अक्षयला यासाठी लागेल ती मदत देखील करत आहे. या सगळ्या प्रकारणामधून अक्षय आणि अमृता मध्ये आता मैत्रीचे नव नाते निर्माण होणार आहे. अक्षय आणि अमृतामध्ये मैत्री फुलत असतानाच अक्षयला कियाराचा शोध लागणार आहे. कियारा आता लवकरच परतणार आहे. कियाराच्या परतण्याने अक्षय आणि अमृताची मैत्री तशीच राहील का? अक्षय अमृताला लग्नबंधनामधून मुक्त करेल का? कियाराला घाडगे परिवारामध्ये आणण्यात अमृता अक्षयला मदत करेल का? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.
अमृता आणि अक्षय दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली असून ही मैत्री मैंने प्यार किया मधील सुमन आणि प्रेमच्या मैत्रीची आठवण करून देणार आहे. त्या दोघांमधील मैत्री जशी निस्वार्थी आणि निर्मळ होती तशीच अक्षय आणि अमृतामधील मैत्री आहे असे नक्कीच प्रेक्षकांना वाटेल यात शंका नाही. पण सुमन आणि प्रेम जसे अनेक अडचणीना तोंड देऊन लग्न बंधनामध्ये बांधले गेले तसे अमृता आणि अक्षय पण आपलं लग्नाचं नातं टिकवू शकतील की अक्षय अमृताला कायमचे सोडून कियाराला स्वीकारेल हे मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
घाडगे & सून या मालिकेत सुकन्या कुलकर्णी, चिन्मय उद्गिरकर, भाग्यश्री लिमये यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आणि कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. भाग्यश्री आणि चिन्मयची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.
Also Read : घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री लिमयेला होते चिन्मय उद्गिरकरवर क्रश