"गेली २ वर्ष माझी सावली होऊन...", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्याची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:39 IST2024-12-14T13:37:09+5:302024-12-14T13:39:55+5:30

कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुमीत पुसावळे प्रसिद्धीझोतात आला.

gharo ghari matichya chuli fame actor sumit pusavale shared special post for wife on her 2nd wedding anniversary  | "गेली २ वर्ष माझी सावली होऊन...", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्याची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट 

"गेली २ वर्ष माझी सावली होऊन...", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्याची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट 

Sumit Pusavale: कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumamachya Navane Changbhale) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुमीत पुसावळे (Sumit Pusavale) प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेत अभिनेत्याने बाळूमामांची प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या सुमीत पुसावळे स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharo Ghari Matichya Chuli) मालिकेत काम करताना दिसतो आहे. मालिकेत अभिनेता साकारत असलेल्या हृषिकेश रणदिवे या पात्राला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय हृषिकेश-जानकीची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 


सुमीत पुसावळे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असलेला पाहायला मिळतो. त्याद्वारे आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तो चाहत्यांना देत असतो. दरम्यान, नुकतीच सुमीतने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केला. अभिनेत्याने त्याची पत्नी मोनिकाला हटके अंदाजात अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय. 
 
सुमीत पुसावळेने इन्स्टाग्रामवर त्याचा आणि पत्नी मोनिकाचा फोटो पोस्ट करत लिहिलंय की, "दोन वर्ष झाली आज बायको, जिच्यामुळे माझ आयुष्य सुंदर बनलं, जी गेली, दोन वर्ष माझी सावली होऊन मला माझ्या सुख दुःखात साथ देतेय, स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेतेय , माझ्या प्रत्येक छोट्या मोठया आवडी निवडी लक्षात ठेवणारी माझी बायको, माझ्यावर कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझ्यावरच प्रेम तसुभरही कमी नाही होत तुझं. तू सोबत असलीस की आयुष्य खूप छान वाटतं."

पुढे अभिनेत्याने लिहलंय, "आजच्या या खास दिवशी मी देवाला प्रार्थना करतो की, माझ्या आयुष्यातल्या या खास व्यक्तीला नेहमी सुखात ठेव. हाच जन्म नाही तर जन्मोजन्मी आपलं नातं असच राहावं, आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको!" सुमीत पुसावळेची ही पोस्ट पाहून मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी प्रतिकिया दिल्या आहेत. 

Web Title: gharo ghari matichya chuli fame actor sumit pusavale shared special post for wife on her 2nd wedding anniversary 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.