'संगीत मानापमान'मधील 'वंदन हो..' गाण्यावर थिरकली गिरिजा प्रभू, व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:43 IST2025-01-16T11:40:05+5:302025-01-16T11:43:44+5:30

Girija Prabhu : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून घराघरात पोहचलेली गिरीजा प्रभू हिलादेखील या गाण्याची भुरळ पडली आहे. नुकतेच तिने या गाण्यावर डान्स केला असून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Girija Prabhu dances to the song 'Vandan Ho..' from 'Sangeet Manapaman', the video is getting likes | 'संगीत मानापमान'मधील 'वंदन हो..' गाण्यावर थिरकली गिरिजा प्रभू, व्हिडीओला मिळतेय पसंती

'संगीत मानापमान'मधील 'वंदन हो..' गाण्यावर थिरकली गिरिजा प्रभू, व्हिडीओला मिळतेय पसंती

सध्या 'संगीत मानापमान' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर एक संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावेने केले आहे. यात सुबोध भावे सोबत सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना  कुलकर्णी, निवेदिता सराफ हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमातील गाणीदेखील हिट ठरली आहे. यातील 'वंदन हो' या गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे. दरम्यान आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहचलेली गिरीजा प्रभू हिलादेखील या गाण्याची भुरळ पडली आहे. नुकतेच तिने या गाण्यावर डान्स केला असून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गिरीजा प्रभू हिने इंस्टाग्रामवर वंदन हो गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यात ती वंदना हो गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. खूपच छान डान्स तिने केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांसोबत कलाकारांनीदेखील कमेंट्स केले आहेत. 


वर्कफ्रंट
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेआधी गिरीजा प्रभूने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केले आहे. गिरीजाने ‘टाइम प्लीज’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले आहे. कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा या सिनेमात ती झळकली आहे. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे. अभिनयासोबतच तिला नृत्याची पण आवड आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता. 

Web Title: Girija Prabhu dances to the song 'Vandan Ho..' from 'Sangeet Manapaman', the video is getting likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.