Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ मध्ये ग्लॅमरस परदेसी गर्लची एन्ट्री, घरातील स्पर्धकांना नाचवणार आपल्या तालावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:25 AM2024-07-27T11:25:41+5:302024-07-27T11:26:14+5:30

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता बिग बॉस घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्ल पाहायला मिळणार आहे.

Glamorous Pardesi girl's entry in Bigg Boss Marathi 5 will make the housemates dance to their tunes | Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ मध्ये ग्लॅमरस परदेसी गर्लची एन्ट्री, घरातील स्पर्धकांना नाचवणार आपल्या तालावर

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ मध्ये ग्लॅमरस परदेसी गर्लची एन्ट्री, घरातील स्पर्धकांना नाचवणार आपल्या तालावर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5) २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या शोचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. त्यामुळे यंदाच्या शोबद्दलची प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. यात कोण कोण स्पर्धक पाहायला मिळणार आहे, असा तर्कवितर्क प्रेक्षक लावत आहेत. दरम्यान आता बिग बॉस घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्ल पाहायला मिळणार आहे. 

कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात परदेसी गर्लची झलक पाहायला मिळत आहे.  'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. प्रोमो पाहून ही कोण आहे, हे जाणून घेण्याबद्दल सर्व आतुर आहेत. या पोस्टवर सर्व तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. 


आपल्या हटके फॅशनने समृद्ध करणारं तिचं व्यक्तीमत्त्व, किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा...   आत्मविश्वाच्या जोरावर जिंकेल का मराठमोळ्या 'बिग बॉस'प्रेमींची मने? ग्लॅमरस परदेसी गर्ल 'बिग बॉस मराठी'च्या घरात कशी करतेय जगण्याची कसरत हे लवकरच पाहायला मिळेल. मराठी मनोरंजनाचा बॉस बिग बॉस मराठी ५चा ग्रॅण्ड प्रीमियर या रविवारी २८ जुलै, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळेल. 

Web Title: Glamorous Pardesi girl's entry in Bigg Boss Marathi 5 will make the housemates dance to their tunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.