'भाकरवडी'मध्ये गोखले कुटुंबाने साजरी केली अण्णांच्या दुकानाची शंभर वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:30 AM2019-02-21T06:30:00+5:302019-02-21T06:30:00+5:30
सोनी सब वाहिनीवरील 'भाकरवडी' या नव्या मालिकेने दोन कुटुंबातील आंबटगोड नातेसंबंध उत्कृष्टरितीने सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोनी सब वाहिनीवरील 'भाकरवडी' या नव्या मालिकेने दोन कुटुंबातील आंबटगोड नातेसंबंध उत्कृष्टरितीने सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अण्णांच्या (देवेन भोजानी) बाकरवडीच्या दुकानाला १०० वर्षे पूर्ण होत असून गोखले कुटुंबिय हा आनंदाचा क्षण साजरा करण्याची तयारी करत आहेत. मात्र, यात काहीतरी गोंधळ आहे.
अण्णांच्या दुकानाची १०० वर्षे साजरी करण्यासाठी गोखले कुटुंबिय तयारी करत असताना अभिषेकला (अक्षय केळकर) त्याच्या बहिणीचा, विभावरीचा (रसिका वेंगुर्लेकर) फोन येतो. या सोहळ्यात तिलाही सहभागी होण्याची इच्छा आहे आणि म्हणून ती तशी विनंती भावाला करते. पण, अण्णांना ती आलेली अजिबात चालणार नाही. त्यामुळे, सगळं कुटुंब अभिषेकला तिला येण्यास नकार देण्यासाठी सांगतं. पण, अभिषेक कोणालाही नकार देऊ शकत नाही. पण, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत अण्णा स्वत:च विभावरीला पत्र लिहितात आणि तिला देण्यासाठी ते अभिषेककडे देतात. दरम्यान, महेंद्र ठाकूर (परेश गणात्रा) आपल्या दुकानाच्या उद्घाटनासाठी एखाद्या सिनेकलाकाराचा शोध घेत असतात. मात्र, अखेर ते या कामासाठी अण्णांनाच आमंत्रित करतात.
अण्णांच्या आमंत्रणाने विभावरीच्या चेहऱ्यावर हसू फुलेल का? महेंद्रच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जातील का? अभिषेकची भूमिका करणारे अक्षय केळकर म्हणाले, "अभिषेक फारच निरागस मुलगा आहे. तो कधीच कुणाला नाही म्हणू शकत नाही. पण, त्यामुळे तो अनेकदा संकटात सापडतो. तो आताचा प्रसंग हाताळू शकेल की नाही, हे आता प्रेक्षकांनी पहायचे आहे."
अण्णांची भूमिका साकारणारे देवेन भोजानी म्हणाले, "अण्णांचे त्यांची मुलगी विभावरीशी अजिबात पटत नाही. पण, तरीही ते तिला या सोहळ्याचे आमंत्रण पाठवतात. यातच खरा ट्विस्ट आहे. आगामी भागात विनोद आणि भावना यांचा मेळ असेल."
'भाकरवडी' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर पाहत रहा.