नशीब फळफळलं..! महाराष्ट्राचा बेस्ट डान्सरच्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकाने दिली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:54 PM2021-03-16T19:54:10+5:302021-03-16T19:54:49+5:30

डान्स शो 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली.

Good luck ..! A contestant gave a job to the contestant of Maharashtra's Best Dancer | नशीब फळफळलं..! महाराष्ट्राचा बेस्ट डान्सरच्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकाने दिली नोकरी

नशीब फळफळलं..! महाराष्ट्राचा बेस्ट डान्सरच्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकाने दिली नोकरी

googlenewsNext

सोनी टीव्ही मराठीवरील डान्स शो 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. प्रथमेश मानेने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, या भागात अधिक चर्चेत आला तो लातूरचा स्पर्धक दीपक हुलसुरे. अतिसामान्य कुटुंबातून आपल्या कलेच्या जोरावर पुढे आलेल्या दीपकचा या मंचापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. मात्र, याच मंचावर त्याचे नशीब फळफळले आहे. त्याला त्याच्या एका चाहत्याने चक्क मोठे सरप्राईज दिले. 

महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या दीपकच्या एका चाहत्याने त्याला स्वतःच्या कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी दिली आहे. प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या अशोक खाडे यांनी दीपकला आपल्या कंपनीत चीफ सिक्युरिटी ऑफिसर ही पोस्ट दिली आहे. इतकेच नाही तर, यासाठी काही अटी देखील त्यांनी ठेवल्या आहेत.


लातूरच्या जगलपूर भागात एका गरीब कुटुंबात दीपकचा जन्म झाला. पहिल्यापासूनच त्याला नृत्याची आणि स्टंट करण्याची आवड होती. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला नृत्याचे शिक्षण घेता आले नाही. मात्र, पुढे लातूर शहरामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्याने अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. अशाच एका कार्यक्रमात त्याने एका मुलाला बॅक फ्लिप मारताना पहिले आणि घरी आल्यानंतर त्याने शेतीची कामे करता करता ही फ्लिप शिकण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याला बरीच दुखापतही झाली. मात्र, त्याने हार मानली नाही.

कॉलेजमध्ये गेल्यावर वडिलांनी त्याला एक मोबाईल घेऊन दिला. दीपक त्याच्यावर व्हिडीओ पाहून नृत्य शिकू लागला. घरची जबाबदारी सांभाळत त्याने आपली कला देखील जोपासण्यास सुरुवात केली. याच कलेच्या आधारावर दोन पैसेदेखील त्याला मिळू लागले. पुढे त्याने अशा नृत्यावर आधारित कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे ठरवले. 'महाराष्ट्रज बेस्ट डान्सर'च्या माध्यमातून तो आणि त्याची ही संघर्ष कथा घराघरात पोहचली.


अशोक खाडे म्हणाले, 'मी माझगाव डॉकमध्ये १५ वर्षे नोकरी केली. या काळात एकदा मी जर्मनीला गेलो. तिथून पुन्हा आल्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. जेव्हा दीपकला मंचावर पाहिले तेव्हा असे वाटले की, ही माझी तर माझ्याचसारखी गरिबी आहे. म्हणून आता मी असे ठरवले की, दीपकला मी माझ्या कंपनीत नोकरी देणार.'


पुढे ते म्हणतात, 'दीपक माझ्या कंपनीत चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करेल. त्याच्या पगारातील १५ हजार रुपये मी त्याच्या आई-वडिलांना पाठवणार, १० हजार त्याला स्वतःच्या खर्चाला देणार. या दरम्यान त्याने त्याची कला जपावी, बाहेरगावी जाऊन शो करावे. त्याला लागतील तितके पैसे मी द्यायला तयार आहे. पण यासाठी अट एकच की, दीपकने महिन्यातून किमान चार दिवस कंपनीत येऊन माझ्यासोबत चहा प्यायचा.' 

Web Title: Good luck ..! A contestant gave a job to the contestant of Maharashtra's Best Dancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :danceनृत्य