मृणाल दुसानिसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:08 IST2024-08-27T18:06:27+5:302024-08-27T18:08:32+5:30
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस तब्बल ५ वर्षांनी भारतात परतली आहे. आता ती पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती मालिकेत काम करताना दिसणार आहे.

मृणाल दुसानिसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर
अभिनेत्री मृणाल दुसानिस मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बऱ्याच मोठ्या कालावधीपासून मालिका विश्वात सक्रीय नव्हती. २०१८ साली मृणालने नीरज मोरेसोबत लग्नगाठ बांधली आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही तिने काम केलेली शेवटची मालिका होती. आता ती तब्बल ५ वर्षांनी भारतात परतली आहे. आता ती पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती मालिकेत काम करताना दिसणार आहे. ती स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेत काम करताना दिसणार आहे. अद्याप तिच्या नव्या मालिकेच्या शीर्षकाबद्दल काहीही समजलेलं नाही. तिचे चाहते तिला नव्या मालिकेत काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
मृणाल दुसानिस ५ वर्षांनंतर पुन्हा भारतात परतली आणि तिने प्रसारमाध्यमांसमोर मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिचे चाहते तिला छोट्या पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक होते. दरम्यान अलिकडेच एका व्यक्तीने मृणालसोबत फोटो शेअर करत अँड वि आर बॅक ऑन सेट विथ मृणाल दुसानिस असे कॅप्शन दिले होते. तेव्हापासूनच प्रेक्षकांना ती लवकरच मालिकेत पाहायला मिळणार असल्याची हिंट मिळाली होती.
मृणाल दुसानिस नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीच्या गणेशोत्सव सोहळ्यात सहभागी झाली होती. त्यावरून ती स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून कमबॅक करणार असल्याचे समजते आहे. मात्र अद्याप या मालिका आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. मृणालसोबत मालिकेत कोण कोण कलाकार असतील, हेदेखील पाहणे कमालीचे ठरणार आहे.