गोविंदाने नेहा कक्करला दिली 'ही' कॉम्प्लिमेंट, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 06:30 IST2018-09-27T09:52:20+5:302018-09-28T06:30:00+5:30
नुकताच सुपरस्टार गोविंदा 'इंडियन आयडॉल10' या संगीत रिअॅलिटी शोमध्ये आला होता. परीक्षकची भूमिका बजावत असलेली नेहा कक्कड गोविंदाला बघून खूपच खूश झाली.

गोविंदाने नेहा कक्करला दिली 'ही' कॉम्प्लिमेंट, वाचा सविस्तर!
जेव्हा तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती तुमच्यासमोर येते, तेव्हा तुम्ही काय करता? आपल्या रोल मॉडेलसोबत एका मंचावर येणे हे सामान्य लोक आणि इतर मान्यवर व्यक्तींचे देखील स्वप्न असते. नुकताच सुपरस्टार गोविंदा 'इंडियन आयडॉल10' या संगीत रिअॅलिटी शोमध्ये आला होता. परीक्षकची भूमिका बजावत असलेली नेहा कक्कर गोविंदाला बघून खूपच खूश झाली. तिने आपल्या डान्सिंग आयडॉलसोबत मंचावर नृत्य केले. जेव्हा या आपल्या लाडक्या कलाकाराकडून तिचे कौतुक करण्यात आले तेव्हा तर तिला आकाश ठेंगणे झाले होते. या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या भागात गोविंदा विशेष अतिथी परीक्षक म्हणून हजेरी लावताना दिसणार आहे.
गोविंदा नेहाबाबत बोलताना म्हणाला, ‘ती खूप छान गायक आणि एक उत्तम माणूस आहेस. मी तुझ्यात गोविंदा पाहतो.’ त्यावेळी नेहाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. आनंदित झालेली नेहा कक्कडने म्हणाली, “मी गोविंदची खूप मोठी चाहती आहे. गोविंदा म्हणजे संपूर्ण मनोरंजन, मी 3-4 वर्षांची असल्यापासून गोविंदाची चाहती आहे. तो माझा रोल मॉडेल, माझी प्रेरणा आहे. माझ्या गोविंदा-वेडाची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. जेव्हा आपल्याला जीवनाचा अर्थ कळत नसतो त्या वयापासून मी त्याची चाहती आहे. गोविंदाची स्वतःची अशी एक विशिष्ट शैली आहे, त्याच्या नृत्याची, अभिनयाचीदेखील. आज इंडियन आयडॉल 10 च्या मंचावर त्याच्यासोबत नृत्य करून मी माझे स्वप्न जगले आहे. मला त्याच्याकडून एक सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली.