डान्स क्लाससाठी रोज 'इतक्या' किलोमीटर चालायचा गोविंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:29 AM2018-06-18T11:29:00+5:302018-06-18T16:59:00+5:30

कलर्सचा नवीन प्रस्ताव डान्स दिवाने हा एक वैशिष्ट्यपूर्ण शो असून त्यात 3 पिढ्यांना एकाच मंचावर येऊन डान्स विषयीची त्यांची ...

Govinda wants to run 'so many kilometers' every day for a dance class | डान्स क्लाससाठी रोज 'इतक्या' किलोमीटर चालायचा गोविंदा

डान्स क्लाससाठी रोज 'इतक्या' किलोमीटर चालायचा गोविंदा

googlenewsNext
र्सचा नवीन प्रस्ताव डान्स दिवाने हा एक वैशिष्ट्यपूर्ण शो असून त्यात 3 पिढ्यांना एकाच मंचावर येऊन डान्स विषयीची त्यांची आवड दाखविण्याची संधी दिलेली आहे. प्रत्येक श्रेणीतील तीन फायनलिस्ट, भारताच्या अतुलनीय डान्स दिवाने साठी लढतील. याचे परीक्षक आहेत आकर्षक माधुरी दिक्षीत नेने, दिग्दर्शक शशांक खेतान आणि अतिशय गुणवान तुषार कालिया. नुकत्याच झालेल्या एपिसोड मध्ये, डान्सिंग आयकॉन गोविंदा आणि व्हायरल सेन्सेशन डान्सिंग अंकल यांनी येऊन मंच उजळवून टाकला होता. गोविंदा त्याच्या जुन्या मित्राला, फिरोझ खानला सुध्दा भेटला, जो आता एक स्पर्धक आहे. आणि ते तरुण असताना एकाच डान्स क्लासमध्ये त्यांची भेट कशी झाली हे सांगितले.
डान्स विषयीची त्यांची आवड आणि दिवानापन सांगताना त्यांना किती कठोर परिश्रम करावे लागत असत ते त्यांनी सांगीतले. “डान्स हे माझे पहिले प्रेम आहे. त्यातून मला एक वेगळीच शक्ती मिळते. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला आठवते की माझा क्लास माझ्या घरापासून खूप लांब होता त्यामुळे मला रोज 19 किमी चालावे लागत असे. एखाद्या खाजगी वाहनातून जायला माझ्या कडे तेव्हा तेवढे पैसे नव्हते पण माझ्या डान्स विषयीच्या प्रेमामुळे मी चालत राहिलो. माझे हे प्रेम पाहून माझ्या डान्स गुरू सरोज खान यांनी माझ्याकडून एक पैसा सुध्दा फी म्हणून घेतला नाही.”

संजीव श्रीवास्तव डान्सिंग अंकलच्या डान्सवर प्रतिक्रिया देताना गोविंदाने सांगितले की, अंकलजीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पूर्ण लक्ष केवळ डान्सवर असते. आजूबाजूला असलेल्या लोकांना बघून त्यांचा अजिबातच गोंधळ होत नाही. आम्हाला कोरिओग्राफरच्या इशाºयावर डान्स करावा लागतो, परंतु अंकलजीने कमालच केली, असे म्हणावे लागेल.  

Web Title: Govinda wants to run 'so many kilometers' every day for a dance class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.