'कुछ रंग प्यार के ऐसे भी' घेणार रसिकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 11:48 AM2017-08-16T11:48:51+5:302017-08-16T18:09:31+5:30

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' म्हणत देव(शाहीर शेख) आणि सोनाक्षी (एरिका फर्नांडिस) घराघरांत पोहचले.रसिकांनी या दोघांच्या लव्हस्टोरीला तुफान ...

Greetings from the audience, taking 'some colors like love' | 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' घेणार रसिकांचा निरोप

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' घेणार रसिकांचा निरोप

googlenewsNext
'
;कुछ रंग प्यार के ऐसे भी' म्हणत देव(शाहीर शेख) आणि सोनाक्षी (एरिका फर्नांडिस) घराघरांत पोहचले.रसिकांनी या दोघांच्या लव्हस्टोरीला तुफान पसंती दिली. या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी साकारलेली ईश्वरी ही भूमिकाही रसिकांना खूप आवडली होती. मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासूनच मालिकेत देव आणि सोनाक्षी यांच्या  ट्विस्ट अँड टर्नमुळे ही मालिका टीआरपी रेटींगमध्येही टॉप 10च्या यादीत होती.उत्तम स्टारकास्ट,उत्तम कथा यामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती.मात्र आता ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.25 ऑगस्टला या मालिकेचा शेटचा भाग प्रसारित होणार आहे.सोशल मीडियावर या मालिकेचे खूप चाहते आहेत.या मालिकेच्या नावाने असलेल्या फॅन पेजलाही लाखोंच्या संख्येने फॉलोवर्स  आहेत. चाहत्यांनी ही मालिका बंद होणार असल्याचे समजताच मालिका बंद करू नका अशी विनंतीच केली आहे. आता पर्यंत हा शो बंद होऊ नये यासाठी पाच हजारांच्यावर चाहत्यांनी आपली मतं नोंदवले आहेत.ही मालिका बंद करू नका मालिकेतील सगळे कलाकार खूप चांगले काम करत आहेत.मालिकेत सध्या सुरू असणार ट्रॅकही खूपच इंटरेस्टींग आहे.त्यामुळे ही मालिका अधिकच रसिकांच्या पसंतीस उतरत असताना मालिका बंद होणार आहे हे निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रीया चाहत्यांनी नोंदवल्या आहेत.'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील देवची भूमिका साकारणारा शाहिर शेख आणि सोनाक्षीची भूमिका साकारणारी एरिका फर्नांडिस या दोघांचीही ही पहिलीच मुख्य भूमिका असणारी मालिका होती.मालिकेत दोघांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.दोघेही लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारे चढ उतारही मालिकेत उत्तम चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली.नुकतेच मालिकेच्या संपूर्ण टीमने शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले.यावेळी मालिकेचे सगळेच कलाकार भावुक झाले होते.जवळपास दीड वर्ष या मालिकेने रसिकांचे मनोरंजन केल्यानंतर आता अलविदा म्हणत या मालिकेच्या स्टारकास्टनेही सोशल मीडियावरुन रसिकांचे आभार मानले आहेत. 

Web Title: Greetings from the audience, taking 'some colors like love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.