‘गुड्डन’मधील कनिकाची डोली तिच्याच सुनांनी उचलली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:20 AM2018-10-17T11:20:25+5:302018-10-17T12:10:11+5:30

कोणत्याही मुलीच्या जीवनाला कलाटणी देणारा लग्न हाच सर्वात मोठा प्रसंग असतो- मग तो वास्तव जीवनात असो की पडद्यावरील आभासी जीवनात.

'Guddan' girl picked up her daughter's ear! | ‘गुड्डन’मधील कनिकाची डोली तिच्याच सुनांनी उचलली!

‘गुड्डन’मधील कनिकाची डोली तिच्याच सुनांनी उचलली!

googlenewsNext

कोणत्याही मुलीच्या जीवनाला कलाटणी देणारा लग्न हाच सर्वात मोठा प्रसंग असतो- मग तो वास्तव जीवनात असो की पडद्यावरील आभासी जीवनात! जीवनातील या सर्वात महत्त्वाच्या दिवशी प्रत्येक मुलीला आपण अगदी सर्वात सुंदर दिसले पाहिजे अशी आस असते. त्यासाठी अचूक कपडे निवडण्यापासून योग्य तो मेक-अप करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत ती अगदी दक्ष असते. तसेच लग्नापूर्वीचे सर्व सोहळे आणि लग्नातील सर्व विधी यांच्याकडे ती खूप अपेक्षा आणि उत्सुकतेने बघत असते. ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेची नायिका गुड्डन (कनिका मान) हिच्या पडद्यावरील विवाहाच्या चित्रीकरणाच्या वेळचा उत्साह आणि लगबगीने भरलेला माहोल पाहून हे तिचे जणू खरे लग्न आहे की काय, अशीच शंका येत होती. भारतातील सर्वात लहान ‘सासू’ असलेल्या गुड्डनचे लग्न अक्षत जिंदल (निशांतसिंह मलकाणी) याच्याशी होत असून या लग्नात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी होत असल्याचे ऑक्टोबरमधील कथानकातून दिसून आले आहे. या लग्नासाठी कनिका मानने लग्नमंडपात प्रवेशच अगदी अनोख्या पध्दतीने केला. वधूची डोली उचलणे हा जणू केवळ पुरुषांचेच काम असल्याचा समज दूर करताना आणि नारीशक्तीचे आगळे दर्शन घडविताना मालिकेतील तिच्या दुर्गा (श्वेता महाडिक), लक्ष्मी (सेहरश अली) आणि सरस्वती (रश्मी गुप्ता) या तीन सुनांनीच तिची डोली खांद्यावर उचलून लग्नमंडपात आणली!

वधूची डोली उचलण्याचे काम पुरुषांचेच असले, तरी समाजमान्य रूढी मोडायच्या कशा, ते गुड्ड्नच्या या सुनांना चांगलेच ठाऊक आहे. या प्रसंगाबद्दल सेहरीश अली म्हणाली, “गुड्डनची डोली आम्हीच उचलून आणायची, याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. इतर कोणाच्याही मदतीशिवाय ही जड डोली लग्नमंडपात आणण्याची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती. डोली उचलण्याचं काम माझ्यासाठी काहीसं अधिकच अवघड होतं कारण श्वेता आणि रश्मी यांनी डोलीचा एक दांडा धरला होता, पण तिचा दुसरा दांडा केवळ मला एकटीलाच उचलायचा होता. पण माझं वजन आणि मी जिममध्ये करीत असलेल्या नियमित व्यायामामुळे मला हा प्रसंग सहज साकार करता आला. डोली उचलून आणणं हा एक मजेदार अनुभव होता.” 

Web Title: 'Guddan' girl picked up her daughter's ear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.