Gudhi Padwa 2025: रेश्मा शिंदेने साऊथ पतीसोबत उभारली गुढी, साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:15 IST2025-03-30T13:14:42+5:302025-03-30T13:15:18+5:30
यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. रेश्मा शिंदेनेही पतीसोबत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा केला आहे.

Gudhi Padwa 2025: रेश्मा शिंदेने साऊथ पतीसोबत उभारली गुढी, साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा
आज संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात. दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही घरोघरी गुढी उभारुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. रेश्मा शिंदेनेही पतीसोबत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा केला आहे.
रेश्माने तिच्या सोशल मीडियावरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेश्माने पतीसोबत मिळून गुढी उभारली. गुढीची पूजा करत चाहत्यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहे. लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी रेश्माने पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर तिच्या पतीने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. "पहिला गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा", असं म्हणत तिने व्हिडिओ शेअर केला आहे.
रेश्माने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पवनसोबत लग्नगाठ बांधली. पवन साऊथ इंडियन असून त्या दोघांनी महाराष्ट्रीयन आणि साउथ पद्धतीने लग्न केलं. पवनी आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून तो युकेमध्ये होता. मात्र लग्नानंतर रेश्मासाठी तो भारतात परतला आहे.