गुरमीत चौधरीने शेअर केल्या लग्नाच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2017 07:07 AM2017-04-03T07:07:56+5:302017-04-03T12:38:55+5:30

रामायण पौराणिक मालिकेत राम सीताच्या भूमिकेत हे झळकलेले गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे कपल रसिकांचे फेव्हरेट कपल बनले ...

Gumesh Chaudhary shares memories of marriage | गुरमीत चौधरीने शेअर केल्या लग्नाच्या आठवणी

गुरमीत चौधरीने शेअर केल्या लग्नाच्या आठवणी

googlenewsNext
class="ii gt adP adO" id=":r0" style="font-size: 12.8px; direction: ltr; margin: 5px 15px 0px 0px; padding-bottom: 5px; position: relative; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif;">
रामायण पौराणिक मालिकेत राम सीताच्या भूमिकेत हे झळकलेले गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे कपल रसिकांचे फेव्हरेट कपल बनले आहेत. गुरमीतच्या सिनेमाच्या निमित्ताने किंवा मालिकेच्या निमित्ताने दोघेही आपापल्या जोडीदाराविषयी आवर्जुन उल्लेख करतात.चाहत्यांनाही त्यांच्या आवडी निवडीविषयी जाणून घ्यायला आवडते. नुकतेच गुरमीतने त्याच्या चाहत्यांसाठी एका खास गोड आठवण शेअर केली आहे.गुरमीतने त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोंना त्याने ''साथीयाँ स्टाइलने दोघांनी पळून लग्न केल्याची साक्ष  देणारा हा फोटो अाहे'' अशी कॅप्शन देत  हा फोटो अपलोड केला आहे.'रामायण' ही पौराणिक मालिकेदरम्यानच हे दोघे प्रेमात पडले होते. काही काळाच्या  मैत्रीनंतर दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि कुटुंबियांना न सांगता गुपचुप लग्न थाटले.आता तब्बल 11 वर्षांनी त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो समोर आले आहेत. यामध्ये देबिना रेड साडीत तर गुरमीत व्हाइट कुर्ता पायजामात दिसतोय.गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते. या दोघांनी रामायण या मालिकेत पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. आता हे दोघे आई-वडील बनले आहेत. या दोघांनी दोन लहान मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.बिहारमधील जरामपूर या गावी हे होळीच्या आठवड्यात जाऊन लता आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेणार आहेत. पूजा ही सहा तर लता ही नऊ वर्षांची आहे. 
 
 
 

Web Title: Gumesh Chaudhary shares memories of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.