गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस'च्या घरातून पडले बाहेर ? जाणून घ्या कुणाचं झालं Eviction!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 03:35 PM2024-10-13T15:35:27+5:302024-10-13T15:36:51+5:30

'बिग बॉस'च्या घरात अभिनेता करण वीर मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं होतं.

Gunratna Sadavarte Latest news Bigg Boss 18 Elimination Gadhraj Donkey Released | गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस'च्या घरातून पडले बाहेर ? जाणून घ्या कुणाचं झालं Eviction!

गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस'च्या घरातून पडले बाहेर ? जाणून घ्या कुणाचं झालं Eviction!

Bigg Boss 18 : सलमान खानचा बहुचर्चित शो 'बिग बॉस 18' सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी 'बिग बॉस हिंदी'च्या 18 (Bigg Boss 18) व्या सीझनमध्ये एन्ट्री घेतलेली आहे.  अगदी पहिल्याच दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते हे 'बिग बॉस'च्या घरात दबदबा निर्माण करताना पाहायला मिळाले होते.  पहिल्याच आठवड्यात ते नॉमनिटेदेखील झाले. आता 'विकेंड का वार'मध्ये ते सेफ झाले आहेत की त्याचं एविक्शन झालं हे आपण जाणून घेऊया. 

'बिग बॉस'च्या घरात अभिनेता करण वीर मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं होतं. गुणरत्न यांच्यासोबत चाहत पांडे, करण वीर मेहरा, मुस्कान बामने, अविनाश मिश्रा हे सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात सदावर्ते घराबाहेर जाणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, गुणरत्न सदावर्ते यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  गुणरत्न सदावर्ते हे या आठवड्यात सेफ झाले आहेत. फक्त  गुणरत्न सदावर्ते हे एकटेच नाही तर इतरही नॉमिनेट झालेले सर्व सदस्य सेफ झाले आहेत. 

'बिग बॉस'च्या घरातून नॉमिनेट सदस्य नाही तर  'गधराज' बाहेर जाणार आहे. त्यामुळे यापुढे 'गधराज'आता बिग बॉसच्या घरात दिसणार नाही. 'बिग बॉस' 18 शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या X अकाऊंटने पोस्टमध्ये नवीन माहिती शेअर केली आहे. 'बिग बॉस'च्या घरात गाढवाला ठेवण्यावरुन प्राण्यांसाठी काम करणारी संस्था PETA (People for The Ethical Treatment of Animals) ने आक्षेप घेतला होता. 'पेटा'ने यावर नाराजी दर्शवत शोच्या मेकर्सला पत्र लिहिले होते. यामुळे 'बिग बॉस'ने लगेचच पावलं उचलली आणि 'गधराज'ची मुक्तता केली. 

Web Title: Gunratna Sadavarte Latest news Bigg Boss 18 Elimination Gadhraj Donkey Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.