'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:17 IST2023-01-16T13:16:54+5:302023-01-16T13:17:16+5:30
Post Office Ughada Aahe : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे.

'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे!
सोनी मराठी वाहिनीवर 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. सर्वांचे आवडते आणि लाडके मकरंद अनासपुरे(Makrand Anaspure)ही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे...' या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.
अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही उत्सुक आहेत.
'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका गुरुवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.