'माझ्या नवऱ्याची बायको' गुरुनाथ होणार का सीईओ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:30 AM2019-05-18T06:30:00+5:302019-05-18T06:30:00+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकाच्या ऑफिसमध्ये ३५ कोटी आणि साखरगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रांची चोरी झाली

Gurunath will be seo in mazya navryachi bayko | 'माझ्या नवऱ्याची बायको' गुरुनाथ होणार का सीईओ?

'माझ्या नवऱ्याची बायको' गुरुनाथ होणार का सीईओ?

googlenewsNext
ठळक मुद्दे राधिका मसालेवर सगळ्यांचा रोष असल्याचे दिसून येतेविक्रांत यशस्वी ठरेल की राजनंदिनीला विक्रांतच खरं रूप कळेल?

झी मराठी वहिनीवर येत्या रविवारी म्हणजेच १९ मे रोजी झी मराठी प्रेक्षकांसाठी माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे आणि स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग सादर करणार आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकाच्या ऑफिसमध्ये ३५ कोटी आणि साखरगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रांची चोरी झाली. पोलीस या चोरीचा तपास करत असताना त्यांच्या हाती ठोस पुरावे लागणार आहेत तर दुसरीकडे राधिका मसालेवर सगळ्यांचा रोष असल्याचे दिसून येते. त्यातच गुरु स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी महाडिक सरांना त्याची सीईओ पदासाठी शिफारीश करण्यासाठी सांगतो. गुरु यामध्ये सफल होईल का? या चोरीच्या मागे गुरूचा हात आहे हे सगळ्यांना कळेल का? हे प्रेक्षकांना रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहता येईल. 

तुला पाहते रे ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. जालिंदरने राजनंदिनीला विक्रांत बद्दल सावध केलं खरं पण राजनंदिनीचा विक्रांतवर आंधळा विश्वास आहे. पण राजनंदिनीला काही गोष्टी तिच्यापासून लपवल्या जात आहेत याची चाहूल लागताच ती या गोष्टींचा शोध घेण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे विक्रांत मात्र बिझनेस आपल्या नावावर कसा करता येईल यासाठी षडयंत्र रचतोय. त्यासाठी तो राजनंदिनीला देखील मार्गातून बाजूला काढू शकतो. विक्रांत यशस्वी ठरेल की राजनंदिनीला विक्रांतच खरं रूप कळेल? हे रविवारी रात्री ८ वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.  गडावर काहीही सण साजरे करू नका, बाहेरून येणाऱ्यांवर बंदी घाला असे शंभूराज्यांचे आदेश असूनही, सोयरा बाईंना शब्द दिल्याने येसू बाई मंगळागौर रद्द करू शकत नाहीत. हे समजल्यावर शंभूराजे त्यांच्या जवळच्या सर्व सेवकांना रायगडी पाठवतात. तेथील सुरक्षा कडक करतात, मात्र दुसरीकडे शंभूराज्यांवर पुन्हा एकदा हल्ला होतो. त्यांच्या बिछान्यावर, गादीवर तलवारीचे वार सापडतात. यामागे अनाजी पंतांचा हात आहे हे उघड होत असतानाच शंभूराज्यांवर विषप्रयोग होतो. त्यातुन राजे सुखरूप बचावणार का? याचं उत्तर प्रेक्षकांना रविवारी रात्री ९ वाजता मिळेल. 
 

Web Title: Gurunath will be seo in mazya navryachi bayko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.