हामिद बारक्झी व सौंदस मौफकिर एमटीव्ही स्प्लिट्सविला X४चे विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:18 PM2023-02-15T20:18:04+5:302023-02-15T20:18:24+5:30
हामिद बारक्झी व सौंदस मौफकिर हे आवड, रोमांस, मैत्रीच्या ट्विस्ट्समध्ये धाडस दाखवत एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या नवीन सीझनचे विजेते ठरले आहेत.
खऱ्या प्रेमाच्या अनपेक्षित परीक्षेमधून जाणे इतके अवघड कधीच नव्हते! पण स्प्लिट्सविलेन्स हामिद बारक्झी व सौंदस मौफकिर हे आवड, रोमांस, मैत्रीच्या ट्विस्ट्समध्ये धाडस दाखवत एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या नवीन सीझनचे विजेते ठरले आहेत. धमाकेदार वाइल्ड कार्ड एंट्रीज, धक्कादायक उलगडे आणि मोहक प्रेम त्रिकूटांनी भरलेला एमटीव्ही स्प्लिट्सविला X४, को-पॉवर्ड बाय वाइल्डस्टोन डिओज व परफ्यूम्स आणि ओएनएन... टोटल कम्फर्ट बहुप्रतिक्षित पॉवर-पॅक ग्रॅण्ड फिनालेसह समाप्त झाला. या ग्रॅण्ड फिनालेमध्ये विजेती जोडी इतर फायनालिस्ट्स जस्टिन-साक्षी आणि कशिश-आकाशलिना यांच्यासोबत प्रख्यात टायटलसाठी तगडी स्पर्धा करताना पाहायला मिळाले.
ग्रॅण्ड फिनाले टास्क मध्ये विजेती जोडी हामिद-सौंदस आणि पहिली उपविजेती जोडी जस्टिन-साक्षी व दुसरी उपविजेती जोडी कशिश-आकाशलिना विविध टप्प्यांमध्ये टास्क करण्यासाठी प्रेम व थंडरच्या प्रवासासाठी सज्ज होते. या टास्कने त्यांची शारीरिक शक्ती, गेमप्ले डावपेच आणि जोडी म्हणून टीमवर्कची चाचणी घेतली, ज्यामध्ये सौंदस व हामिद यांनी चमकदार कामगिरी करण्यासोबत अस्सल जोडीचे प्रतिनिधीत्व केले. प्रिन्स नरूला नंतर पहिल्यांदाच रोडीज विजेते स्प्लिट्सविलाचे विजेते देखील ठरले आहेत.
अथक मेहनतीने मिळवलेल्या विजयाबाबत बोलताना सौंदस मौफकिर म्हणाली, हमीदसोबत एमटीव्ही स्प्लिट्सविला X४ जिंकून मला खूप आनंद होत आहे. तो एक उत्तम सहकारी आणि अत्यंत सहाय्यक व्यक्ती आहे. सीझन किती आव्हानात्मक होता हे पाहता एकत्र राहिल्याबद्दल आणि आमच्या कनेक्शनची योग्यता सिद्ध केल्याबद्दल मला आमचा खूप अभिमान आहे. तसेच, दोन भिन्न व्हिला असल्याने या सीझनमध्ये आमचा ए-गेम वैयक्तिकरित्या सादर करणे देखील आवश्यक होते. हा एक नेत्रदीपक सीझन होता आणि मी या विजयाचे नक्कीच कौतुक करणार आहे.
विजेते ठरल्याबाबत हामिद बारक्झी म्हणाला, रोडीज रिवॉल्यूशननंतर एमटीव्ही स्प्लिट्सविला X४ जिंकणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ही एक रोलरकोस्टर राइड आहे आणि मला आनंद आहे की, सौंदस व मी स्थापित केलेले नाते टिकवून ठेवू शकलो. अडथळे आणि इतरांकडून आलेल्या टीकेला न जुमानता आम्ही ते पार केले. अर्जुन सरांनी आम्हाला शोमध्ये आरामदायक वाटेल अशी भावना दिली आणि सनी मॅडम एक उत्तम मार्गदर्शक होत्या. हा अनुभव उत्कृष्ट होता आणि आम्ही येथे काही अद्भुत मित्र बनवले आहेत.