Happy Birthday Lata Mangeshkar: लता दीदींच्या गीतांनी बहरलं ह.म.बने तु. म.बने कुटुंब, असा रंगणार विशेष भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 06:30 AM2019-09-28T06:30:00+5:302019-09-28T06:30:00+5:30

सारी दुनिया गानकोकीळा लतादीदींच्या आवाजावर फिदा आहे. चार दशकापासून जिचा आवाज संगीतक्षेत्रात घुमतो आहे, अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर २८ ...

Happy Birthday Lata Mangeshkar: Songs of Lata Didi The special part that will be played by the Mbane family | Happy Birthday Lata Mangeshkar: लता दीदींच्या गीतांनी बहरलं ह.म.बने तु. म.बने कुटुंब, असा रंगणार विशेष भाग

Happy Birthday Lata Mangeshkar: लता दीदींच्या गीतांनी बहरलं ह.म.बने तु. म.बने कुटुंब, असा रंगणार विशेष भाग

googlenewsNext

सारी दुनिया गानकोकीळा लतादीदींच्या आवाजावर फिदा आहे. चार दशकापासून जिचा आवाज संगीतक्षेत्रात घुमतो आहे, अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर २८ सप्टेंबरला ९० वर्षांच्या होत आहेत. लता दीदींच्या याच कारकीर्दीला सलाम करत 'ह.म.बने तु.म.बने' मालिकेच्या माध्यमातून लता दीदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या विशेष भाग रसिकांना पाहायला मिळणार आहे. या विशेष भागात  आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला साजेसं गाणं लता दीदींनी आपल्या सुरेल कारकीर्दीत गायलं आहेच. ज्याचा अचूक वापर ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या  पाहायला मिळणार आहे. 


स्वरसम्राज्ञीच्या गीतांनी बहरलेला हा भाग विशेष ठरणार आहे गीतांमधून होणाऱ्या संवादासाठी. आजपर्यंत कोणतीही मालिका संवादाशिवाय प्रक्षेपित केली गेली नव्हती. मात्र यावेळी लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त सादर होणाऱ्या भागात एक नवा प्रयोग करताना आपल्याला दिसणार आहे. कोणताही संवाद नसलेल्या या भागात ह.म.बने तु.म.बने कुटुंबीय लता दीदींच्या गाण्यातून संवाद साधताना दिसणार आहेत.


बने आज्जी - अप्पांपासून ते पार्थ - रेहापर्यंत सगळ्यांच्या वयाला आणि भावनांना व्यक्त करतील अशी गाणी लता दीदींनी गायली आहेत. यापैकी नेमकी कोणती गाणी बने कुटुंबाच्या भावना व्यक्त करण्यास सहाय्यक ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहेत. 

Web Title: Happy Birthday Lata Mangeshkar: Songs of Lata Didi The special part that will be played by the Mbane family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.