टीव्ही कलाकारांनी अशा शब्दात दिल्या मातृदिनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 10:01 AM2018-05-11T10:01:22+5:302018-05-11T15:31:22+5:30

'आप के आ जाने से' मधील साहिल ऊर्फ करण जोटवानी म्हणाला,“मला माझ्या आईविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्या खास दिवसाची ...

Happy Birthday to TV Artists! | टीव्ही कलाकारांनी अशा शब्दात दिल्या मातृदिनाच्या शुभेच्छा!

टीव्ही कलाकारांनी अशा शब्दात दिल्या मातृदिनाच्या शुभेच्छा!

googlenewsNext
'
;आप के आ जाने से' मधील साहिल ऊर्फ करण जोटवानी म्हणाला,“मला माझ्या आईविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्या खास दिवसाची गरज नाही.माझ्यासाठी प्रत्येक दिवस मातृदिनासारखाच असतो.ह्या एवढ्‌या वर्षांमध्ये माझ्या आईने माझ्यासाठी जे काही केले आहे त्यासाठी मी तिचे मानत असलेले आभार कमीच पडतील. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा माझी आई मला कविता शिकवायची आणि त्यामुळे मला एक उत्तम अभिनेता बनण्यास मदत झाली आहे.आईचे प्रेम सर्वांत विशुद्ध असते कारण ते निरपेक्ष असते.आपण आपल्या आईला प्रत्येक क्षणी आपले तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगायला हवे.”



'इश्क सुभान अल्ला'मधील झारा ऊर्फ ईशा सिंग म्हणाली,“माझ्यासाठी प्रत्येक दिवस मातृदिनासारखाच असतो. मी काही खास योजना बनवलेली नाही पण मला माझ्या आईसोबत चांगला वेळ घालवायचा आहे आणि तिला रात्री उशीरा लाँग ड्राईव्हसाठी घेऊन जायचे आहे.माझ्या आयुष्यात अनेक लोकांचा या ना त्या प्रकारे प्रभाव पडलेला आहे. पण माझ्या आईने माझ्यासाठी अशा गोष्टी केल्या आहेत जे अन्य कोणीही करू शकले नसते.माझी आई माझ्यासाठी माझे जग आहे.मी ह्या मातृदिनाच्या निमित्ताने सगळ्‌यांच्या आईला शुभेच्छा देते.”



'इश्क सुभान अल्ला'मधील कबीर ऊर्फ अदनान खान म्हणाला,“आपल्या आईसोबत असलेले आपले नाते साजरे करण्यासाठी आपल्याला एखाद्या खास दिवसाची गरज असते असे मला अजिबात वाटत नाही. आई ही परमेश्वराची सगळ्‌यात मोठी भेट आहे आणि तिच्यावर नेहमीच प्रेम आणि आदर केला जायला हवा. मातृदिनाच्या निमित्ताने मी माझ्या आईला तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी घेऊन जाईन आणि तिच्यासोबत दिवस घालवेन.”

Web Title: Happy Birthday to TV Artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.