'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:00 PM2023-04-27T15:00:52+5:302023-04-27T15:01:30+5:30

Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

'Hardest job in shooting...', Milind Gawli of 'Ai Khe Kya Karete' fame tells anecdotes from the sets | 'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा

'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा

googlenewsNext

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानक आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी(Milind Gawali) यांनी साकारली आहे. ते सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. दरम्यान नुकताच त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. 

मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एक लहान मुलगी पाहायला मिळत आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम काय असेल तर लहान बाळांबरोबर, लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणं सगळ्यात कठीण असतं, खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घ्यायचं असतं हे त्यांना माहितीच नसतं, माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला, माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमांमध्ये काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.


पुढे त्यांनी लिहिले की, एकदा जया बच्चन यांची प्रॉडक्शनची एक सिरीयल सात फेरे नावाची, त्यात मी काम करत होतो, एक छोटीशी सहसा वर्षाची मुलगी जिने मराठीमध्ये “कळत नकळत” नावाचा चित्रपट केला होता, ती काम करत होती, मदन बावरिया नावाचे कुणीतरी डायरेक्टर होते, डायलॉग व्यवस्थित बोलता येत नाहीत म्हणून ते तिला इतके ओरडले की ती मुलगी ओक्साबोक्शी रडायला लागली, त्या डायरेक्टरनी त्या मुलीला काढून टाकले. देबू देवधर त्या सिरीयलचे कॅमेरामन होते, मग त्यांची लेक सई तिला बोलवण्यात आलं, सई पण लहान होती, तिचे बाबाचं कॅमेरामन होते , त्याच्यामुळे तिच्यावर काही त्या डायरेक्टरला ओरडता वगैरे आलं नाही. गपचूप सईचं सगळं त्यांना ऐकावं लागतं होत, तिच्या कलानी घ्यावं लागत होतं, ते बघून मला फार आनंद झाला होता.


असे खूप बरे वाईट अनुभव आहेत पण आमच्या आई कुठे काय करतेच्या सेटवर आमची जी त्वीशा Twisha आहे, तिच्या बरोबर आमचं डिरेक्शन डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट इतक्या छान पद्धतीने तिचं शूटिंग करतात, हे बघून मला फार आनंद आणि त्यांचं कौतुक करावंसं वाटतं, त्विशाचे झोपायचे सीन असेले तर तिच्या झोपेच्या वेळीत ते शूट केले जातात, ती जागी असेल ,हसत खेळत असेल, तर मग बाकीचे शूटिंग थांबून तिचं शूटिंग केलं जातं, तिचा मूड नसेल तर मग नाहीच करत शूटिंग. रवी सर @ravikarmarkar , सुबोध @baresubodh आणि तुषार @tusharvichare तुमचं खरंच खूप कौतुक आहे. तुषार त्विशा बाळा खेळतांनाचा बी टी एस चा व्हिडिओ मी जो share केला आहे. त्याच्याने अंदाज येईल की तिच्याबरोबर कसं शूटिंग करतात..मला तर अनिरुद्ध चे सीन करून जितकं स्ट्रेस आणि प्रेशर येतं ते त्विशाकडे बघितलं की सगळं निघून जातं आणि चेहऱ्यावर एक हास्य आणि मन प्रसन्न होऊन जातं, असे ते सांगतात.

Web Title: 'Hardest job in shooting...', Milind Gawli of 'Ai Khe Kya Karete' fame tells anecdotes from the sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.