हर्ष राजपूतला कुटुंबियांकडून मिळाले 'हे' सरप्राईज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 06:00 IST2018-09-05T12:10:37+5:302018-09-06T06:00:00+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका रंगविणारा हर्ष राजपूत हा आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

हर्ष राजपूतला कुटुंबियांकडून मिळाले 'हे' सरप्राईज!
‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका रंगविणारा हर्ष राजपूत हा आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या मालिकेत तो दावंशाची (अर्धा माणूस, अर्धा पिशाच्च) भूमिका साकारीत असल्याने त्याला आपल्या कुटुंबियांची भेट घेण्यास वेळ मिळत नाही. वास्तविक हर्ष हा कुटुंबवत्सल स्वभावाचा असून त्याला आपल्या जिवलग नातलगांची, विशेषत: आपल्या आईची सारखी आठवण येत असते. मालिकेतील त्याच्या अंश या व्यक्तिरेखेप्रमाणाचे तोही कुटुंबावर प्रेम करणारा आहे. हर्षला अनपेक्षितपणे आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी त्याची अलीकडेच अनपेक्षितपणे भेट घेतली. हे सारे कुटुंबीय अहमदाबादवरून विमानाने आले. त्यांना पाहून आनंदित झालेल्या हर्षने सांगितले, “दिवसभर प्रदीर्घ काळ चित्रीकरण संपवून मी घरी आलो, तेव्हा माझ्या कुटुंबियांना तिथे बघून मला आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. नजरचं चित्रीकरण सुरू झाल्यापासून मी या मालिकेला वाहून घेतलं होतं आणि त्यामुळे मला माझ्या घरी जाऊन माझ्या कुटुंबियांना भेटताच आलं नव्हतं. आता ते काही काळ माझ्याबरोबर इथे राहणार असल्याने मला मानसिक आधार मिळाला आहे. ते जवल असले की मी खुशीत असतो.”
‘नजर’ मालिकेत प्रेक्षकांना वारंवार अनपेक्षित धक्के बसत असतात आणि बरेचदा अंगावर भीतीचा काटा आणणाऱ्या अमानवी शक्तींचे दर्शन घडत असते. मोहना ही डायन आपली मुलगी रूबी आणि अंश राठोड यांचा विवाह कधी होत आहे, याची आतुरतेने वाट बघत असते. कारण तसे झाल्यास तिला तिच्या शक्ती परत मिळणार असतात. पण अंशच्या आयुष्यात पियचाही प्रवेश झाला आहे. प्रेक्षकांना आता सुष्ट-दुष्टांमधील तीव्र संघर्ष पाहायला मिळणार असून त्यामुळे त्यांच्यातील उत्कंठा वाढली आहे.